माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासरे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विवाहिता सोनाली सयाजी केंडे यांनी फिर्याद दिली आहे.
सातारा : माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासरे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विवाहिता सोनाली सयाजी केंडे यांनी फिर्याद दिली आहे.
नवरा सयाजी केंडे, सासरा कोंडीबा विठु केंडे व सासू जनाबाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली यांचा विवाह एक वर्षापूर्वी सयाजी केंडे यांच्या समावेत झाला होता. दिनांक 20 जानेवारी 2021 ते आजतागायत सयाजी केंडे सासू-सासर्यांनी सोनाली यांचा माहेरून पैसे आणावेत या कारणाकरता वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला, अशी फिर्याद देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.


