दळण घेऊन येते असे सांगून घरातून चाळीस वर्षीय विवाहिता आपल्या नऊ वर्षाच्या मुलीसह शनिवार पेठ सातारा येथून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी प्रशांत रघुनाथ आपटे वय 44 राहणार 102 शनिवार पेठ यांनी सातारा शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.
सातारा : दळण घेऊन येते असे सांगून घरातून चाळीस वर्षीय विवाहिता आपल्या नऊ वर्षाच्या मुलीसह शनिवार पेठ सातारा येथून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी प्रशांत रघुनाथ आपटे वय 44 राहणार 102 शनिवार पेठ यांनी सातारा शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.
प्रिया प्रशांत आपटे वय 40 ईशा प्रशांत आपटे वय नऊ असे गायब झालेल्या मायलेकींची नाव आहे. दिनांक 13 जून रोजी सायंकाळी सात वाजता प्रिया आपटे आपल्या सासूला दळण घेऊन येते, असे सांगून आपल्या मुलीसह बाहेर पडल्या. त्या रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांचे पती प्रशांत आपटे यांनी याबाबतची तक्रार केली आहे. हवालदार एस. खलिफा तपास करत आहेत.


