maharashtra

मद्यधुंद पोलीस वाहनचालकाने दोन दुचाकींना ठोकरले; गुन्हा दाखल


A drunken police driver hit two bikes; Filed a crime
सातारा-कोरेगाव रस्त्यावरील शहरालगत संगमनगर येथे पोलिसांच्या आयशर व्हॅनने दोन दुचाकींना धडक दिल्यानंतर त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून अन्य दोघांना दुखापत झाली आहे. बेदरकारपणे चालवणार्‍या पोलिसाने मद्यप्राशन केले असल्याचा उल्लेखही तक्रारीत झाल्याने खळबळ उडाली असून शहर पोलिस ठाण्यात व्हॅनवरील पोलिस चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील शहरालगत संगमनगर येथे पोलिसांच्या आयशर व्हॅनने दोन दुचाकींना धडक दिल्यानंतर त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून अन्य दोघांना दुखापत झाली आहे. बेदरकारपणे चालवणार्‍या पोलिसाने मद्यप्राशन केले असल्याचा उल्लेखही तक्रारीत झाल्याने खळबळ उडाली असून शहर पोलिस ठाण्यात व्हॅनवरील पोलिस चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
स्वानंद ढाणे या पोलिसा विरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून शांतीलाल छगनलाल रावळ (वय 62, रा.सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 12 रोजी घडली आहे. तक्रारदार शांतीलाल रावळ यांनी तक्रारीत म्हटले आहे की, संगमनगर बसस्टॉप पुढे अनिल वाघेल हे दुचाकीवरुन डबलसीट जात असताना एमएच 12 सीजी 9784 या पोलिस आयशर व्हॅनची धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीवरील अनिल वाघेल व मनिषा शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले.
यानंतर तक्रारदार हे दुचाकीवरुन सोनाली वंजारी यांना घेवून जात असताना वंजारी यांनी बचावासाठी उडी मारल्याने त्यांना दुखापत झाली. या सर्व घटनेनंतर परिसर हादरुन गेला. अपघातानंतर मुख्य रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली. परिसरातील नागरिक संतप्त झाले. यावेळी पोलिस व्हॅनवरील चालकाला पाहिले असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचा वास येत होता. तक्रारदार यांनीही ही बाब पाहिली.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु असून दोघे गंभीर जखमी असल्याचे समोर आले. तक्रारदार यांनी तक्रार केल्यानंतर पोलिस व्हॅनवरील पोलिस चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.