Phaltan

esahas.com

सप्टेंबरअखेर शहर व तालुक्यात बाधितांची संख्या 4 हजारपेक्षा अधिक होण्याची शक्यता

‘फलटण शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सुमारे 2 हजारपर्यंत पोहोचली असून, त्यापैकी 700 रुग्ण फलटण शहरात आहेत. आतापर्यंत 30 ते 40 दिवसांनी दुप्पट होणारी रुग्णसंख्या आता 15 दिवसांत दुप्पट होत असून, त्यामध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे. सप्टेंबरअखेर शहर व तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 4 हजारपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली. 

esahas.com

मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्याचिका दाखल करावी

मराठा समाजाला दिलेले आरक्षण राज्य सरकारने कायम ठेवून त्याचा अध्यादेश काढावा.तसेच सुप्रीम कोर्टात पुनर्याचिका दाखल करण्यात यावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्यावतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

esahas.com

सत्ताधारी राजे गटाकडून कोरोना काळात जनतेच्या पैशांची उधळपट्टी

‘नगरपालिकेची जागा नसताना विकासकामांच्या नावाखाली त्या जागेवर आमदार फंड टाकला जात असून, हा प्रकार खपवून घेणार नाही. या निर्णयाला आमचा विरोध आहे. त्या ठिकाणी आमदार फंड टाकल्यास आम्ही जिल्हाधिकार्‍यांकडे 308 अन्वये तक्रार करणार असून, सत्ताधारी राजे गटाकडून कोरोना काळात जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे,’ असा गंभीर आरोप फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला आहे.

esahas.com

फलटण तालुक्यात पावसामुळे बाजरीसह ऊस पीक भुईसपाट

फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्‍यांची त्रेधातिरपीट उडाली. हातातोंडाशी आलेल्या ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने यावर्षी शेतकर्‍याच्या उसाचा तोटा मोठ्या प्रमाणात होणार, त्यामुळे संबंधित विभागाने झालेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

esahas.com

पवारवाडीत मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी दांडक्यांची कारवाई

पवारवाडी, ता. फलटण या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, प्रशासनाकडून पवारवाडीमध्ये योग्य ती दखल घेऊन मास्क न लावणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असताना पवारवाडीतील मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर दंडुकांची कारवाई केली जात आहे.

esahas.com

फलटणमध्ये पाचशे ऑक्सिजनयुक्त बेड उभारण्यासाठी प्रयत्नशील 

‘कोव्हिड-19 या आजाराचा फैलाव खूप झपाट्याने होत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणामध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत व काही रुग्णांना जर ऑक्सिजन देण्याची गरज भासली तर तेवढे ऑक्सिजनचे बेड आपल्या फलटणमध्ये उपलब्ध नाहीत.

esahas.com

फलटण तालुका व शहर परीट (धोबी) समाजातर्फे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन

परीट (धोबी) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरिता सामाजिक न्याय विभाग केंद्र सरकार  यांनी पाठवलेल्या प्रपत्रामध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने विहित प्रपत्रामध्ये राज्य शासनाने माहिती भरून पाठवण्याबाबतचे निवेदन फलटण तालुका व शहर परीट (धोबी) समाजाच्यावतीने उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांना दिले आहे.       

esahas.com

लॉकडाऊनमुळे साखरवाडी विद्यालयाचा परिसर सुनासुना

कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण राज्यातल्या शाळांना सुट्या आहेत. सध्या विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. यामुळे संपूर्ण राज्यातल्या शाळा ओस पडल्या असून, येथे कोणीही फिरकत नसल्यामुळे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सध्या शांततेचे वातावरण तयार झाले आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांची नेहमीच शाळेमध्ये वर्दळ होती, ती पूर्णपणे या कोरोना महामारीमुळे थांबली आहे.

esahas.com

वाढत्या वाहतुकीमुळे सुरवडी-साखरवाडी रस्ता खचला

सुरवडी-साखरवाडी रस्त्यावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत चालली असून, हा रस्ता अवजड वाहतुकीमुळे जागोजागी खचला आहे. रस्त्यावर जागोजागी अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना या खड्ड्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

esahas.com

रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्येचेे शेतकर्‍यांना निंबोळी अर्कविषयी मार्गदर्शन

भालवडी, ता. माण येथील शेतकर्‍यांना पाच टक्के निंबोळी अर्क हे कोणत्याही पिकांवरील किडींसाठी प्राथमिक फवारणीसाठी योग्य असते. याची माहिती देण्यासाठी व त्याचे अनुकरण आपल्या पिकांवर कसे करावे, यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत, अकलुज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या अनुराधा शामराव बनसोडे हिने पाच टक्के निंबोळी अर्क कसे बनवायचे व निंबोळी अर्कचा वापर विविध पिकांवर कसा करावा, याचे शेतात प्रात्यक्षिक करून दाखवले