Phaltan

esahas.com

फलटण-पंढरपूर रेल्वे सर्वेक्षणाबाबत आढावा बैठक संपन्न

पुणे येथे विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या विविध प्रश्‍नांच्या संदर्भामध्ये आढावा बैठक संपन्न झाली. 

esahas.com

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी माणसांचा पाठिंबा आवश्यक

‘महाराष्ट्र साहित्य परिषद नेहमीच मराठी भाषा, साहित्य व संस्कृती याचे संवर्धन करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे, त्याला सर्व मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला पाहिजे,’ अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली. 

esahas.com

फलटण शहरात दोन महिन्यांपासून जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद

गेली दोन महिन्यांपासून शहरातील स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय, महाराजा मंगल कार्यालय या भागात मोपेड मोटार सायकलवरून जाणार्‍या महिला व मुलीच्या हातातील पर्स, अथवा गाडीचे बास्केट, हॅण्डेलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून जाणार्‍या एका आरोपीस व त्याकडून मुद्देमाल विकत घेणार्‍या तीन जणांना अटक करून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे.

esahas.com

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर वाढदिवस शुभेच्छा स्वीकारण्यासाठी फलटण येथे उपलब्ध नसल्याने अनेकांनी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या तर दिल्ली येथे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना रेल्वेमंत्री ना. पियुष गोयल यांनी प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या.

esahas.com

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुप्त गुणांना वाव द्यावा

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अंगातील सुप्त गुणांना ओळखून त्यांना वाव दिला पाहिजे. शिक्षणा बरोबरच खेळालाही महत्त्व देऊन आपणास प्रगती करता येते. केवळ खेळात प्रावीण्य मिळवून ही थेट प्रशासकीय सेवेत काम करण्यास संधी मिळते,’ असे उद्गार पुणे प्रादेशिक उपविभागाचे वाहन निरीक्षक संभाजी गावडे यांनी काढले.

esahas.com

फलटणमधील ‘हनी ट्रॅप’ टोळ्यांवर कारवाई करणार

तालुक्यातील विविध क्षेत्रांतील वजनदार व धनिकांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणार्‍या ‘हनी ट्रॅप’ टोळीची फलटण तालुक्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, पोलीस विभागही यापुढे अशा टोळ्यांवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत असून गोपनीय पद्धतीने सर्व प्रकारची माहिती घेण्यासही सुरुवात झाली आहे. पुढील काळात निश्‍चितच या प्रकारच्या टोळ्यांवर कारवाई होणार आहेत.

esahas.com

पिंप्रद येथे झोपडी पेटवल्याने महिलेचा होरपळून मृत्यू

येथील पिंप्रद येथे जमिनीमध्ये झोपडी टाकल्याचा राग मनात धरून झोपडी पेटवून दिल्याने या झोपडीत झोपलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून एक लढा उभारू

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील आपल्या गावात, वाडी-वस्तीवर आलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना आपल्या कुटुंबातील लोकांची माहिती द्या. घरातील कोणत्याही व्यक्तीला थंडी, ताप, खोकला व तत्सम आजाराची लक्षणे दिसून येत असतील तर त्याची कल्पना देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून एक लढा उभारू,’ असे प्रतिपादन फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या रेश्माताई भोसले यांनी केले.

esahas.com

पत्रकारांना तत्काळ विमा संरक्षण द्यावे 

कोरोनाचा हाहाकार वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांना इत्थंभूत माहिती मिळावी, यासाठी प्रयत्न करणारे पत्रकार विमा संरक्षणापासून वंचित राहत आहेत. यासाठी आज मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी विमा योजना तत्काळ सुरू करावी, याबाबत तहसीलदार आर. सी. पाटील यांना फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांनी निवेदन दिले. व ठरल्याप्रमाणे आरोग्य मंत्र्यांना एसएमएस केले.

esahas.com

कोरोनाशी लढत-लढत आपण जगायला हवं

‘कोरोनाची भीती सर्वांनाच लागलेली आहे. साथीच्या रोगांवर आपण जसे घरगुती उपाय किंवा दवाखान्यातून एखादे इंजेक्शन घेऊन त्यावर उपाय करतो, त्याचप्रमाणे कोरोनाचे नियम पाळून, आपण कोरोनावर मात करू शकतो. त्यामुळे कोरोनाबाबत असणारी मनातील भीती काढून, आपल्या कुटुंबीयांची  कोरोना चाचणी करून घ्यावी. कोरोना व्हायरसशी लढत-लढत आपण जगायला शिका,’ असे प्रतिपादन विधान परीषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.