Phaltan

esahas.com

‘श्रीदत्त इंडिया’च्या 132 कामगारांना पूर्ण वेतन वाढ देण्याचे जाहीर

येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या तब्बल 132 कामगारांना पूर्ण वेतन वाढ देण्याचे कारखाना प्रशासनाने जाहीर केले असून, यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर व महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. सदरची वेतनवाढ जाहीर झाल्यामुळे यासर्व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्वांनी ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांचा सत्कार करून विशेष आभार मानले.

esahas.com

रामराजेंच्या वयाचे भान राखून मी गप्प; अन्यथा त्यांची जागा आतमध्ये असती

‘गेल्या तीस वर्षांच्या कालावधीत मोठमोठी पदे मिळूनही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना फलटण तालुक्यात कोणतेही भरीव विकासकाम करता आलेले नाही, विकासकामाचा त्यांनी नुसता दिखावा केला असून, आपल्या हक्काचे पाणी बारामतीकरांना विकून त्याबदल्यात पदे भोगण्यात त्यांनी धन्यता मानली आहे. त्यांच्या वयाचे भान राखून मी गप्प आहे अन्यथा त्यांची जागा आतमध्ये असती,’ असा घणाघाती आरोप खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.

esahas.com

सुरवडी येथे ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’कडून रस्ता रोको आंदोलन

लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजबिले तातडीने माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता फलटण-लोणंद रोड राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात व ऊर्जा मंत्री तसेच सरकारचा रस्ता रोको करून जाहीर निषेध केला.

esahas.com

फलटण तालुक्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 274 कोटींची तरतूद

फलटण शहर व तालुक्यातील विकासकामांसाठी नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 274 कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. तर फलटण-सातारा रस्त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक निधीतून 176 कोटींची तरतूद करण्यात आली असून, यातून या संपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण होणार असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. 

esahas.com

मनोज जाधव यांचा ‘ज्ञानदीप शिक्षण संस्थे’च्या वतीने सत्कार

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुणवंत अधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चंद्रकांत जाधव यांना पुरस्कार देण्यात आला. त्यानिमित्ताने ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

esahas.com

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घेतली भेट

दिल्ली येथे माढा मतदार संघाचे पाणीदार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सपत्नीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मतदार संघातील विविध प्रश्‍नाच्या संदर्भामध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर उपस्थित होत्या.

esahas.com

कोळकीच्या बहीण-भावंडांनी चारशे जोर मारून अनोख्या पद्धतीने साजरा केला महिला दिन

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोळकी (ता. फलटण) येथील बहीण-भावंडांनी सलग चारशे जोर मारून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. इंटरनेटच्या मायाजाळात अडकण्यापेक्षा व्यायामाद्वारे शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर भर द्या, असाच संदेश या निमित्ताने तनिष्का, समिक्षा व हर्षद या देशमुख बहीण-भावंडांनी दिला आहे व तो सर्वत्र कौतुकाचा ठरला आहे.

esahas.com

फलटण शहर पोलीस ठाण्यातर्फे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त फलटण उपविभाग अंतर्गत फलटण शहर पोलीस ठाणे येथे फलटण उपविभाग अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

esahas.com

सद्गुरू पतसंस्थेने उद्दिष्ट पूर्ततेसाठी केलेला प्रयत्न  कौतुकास्पद

‘गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला, याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला. त्याचा फटका सहकार क्षेत्रालाही बसला. पतसंस्थांची वसुली करताना अनंत अडचणी आल्या, अशाही परिस्थितीत सद्गुरू पतसंस्थेने पारदर्शी व काटकसरीने काम करीत उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रयत्न करून सभासदांना आठ टक्के लाभांश देत आहे ही खरोखरंच आजच्या परिस्थितीत कौतुकाची बाब ठरेल,’ असे प्रतिपादन सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.

esahas.com

फरांदवाडी कृषिक्रांती कंपनीच्या ग्रेडिंग युनिटचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा

‘फरांदवाडी येथील कृषिक्रांती कंपनीच्या ग्रेडिंग युनिटमध्ये गहू व इतर धान्य प्रतवारी करून जादा दर मिळवावा. या ग्रेडिंग युनिटचा तालुक्यातील शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी फिरोज शेख यांनी केले.