Phaltan

esahas.com

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची एटीएम सेवा ग्राहकांच्या हिताची

‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या हिताचे नेहमीच प्रश्‍न प्राधान्याने सोडवण्याचे काम करत आहे. फलटण पंचायत समितीच्या प्रांगणात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एटीएमची सेवा दिल्याने एटीएमची सेवा ग्राहकांच्या हिताचे ठरणारी आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

esahas.com

फलटणमध्ये ‘भाजपा’तर्फे ‘दार उघड उद्धवा दार उघड’ची हाक देत अनोखे आंदोलन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे कुलूपबंद असल्याने भाविकांना आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे नियमित उघडण्याच्या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे ‘भाजपा’तर्फे ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशी हाक देत आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात दि. 18 मार्चपासूनच मंदिरे व सर्व धार्मिक पूजा बंद आहेत.

esahas.com

कोरोना रुग्णांना सोयी-सुविधा देण्यास प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यास खपवून घेतला जाणार नाही

‘कोविड-19 या आजाराचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या पार्श्‍वभूमीवर फलटण तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांनी व ग्रामीण रुग्णालयातील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर व कर्मचार्‍यांनी कोविड रुग्णांना योग्य ते उपचार देण्याकामी व त्यांना सोयी-सुविधा पुरवण्याबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये. अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल तसेच चांगले काम करणार्‍यांच्या ही पाठीशी ठाम पणे उभे राहणार आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळ

esahas.com

संभाजी ब्रिगेड फलटणचे विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

शेतकर्‍यांच्या दुधाला आधारभूत भाव, पशुखाद्य किमतीवर नियंत्रण व शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, रासायनिक खते व औषधे यामधील भेसळ व किमतीवर नियंत्रण ठेवण्याबाबत संभाजी ब्रिगेड फलटण तालुक्याच्यावतीने तहसीलदार आर. सी. पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

esahas.com

निकोप हॉस्पिटल कोव्हिड रुग्णांसाठी अधिग्रहण करण्यास विरोध करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करावी

येथील धर्मादाय व शासकीय विभागाशी निगडित अनुदानाचा लाभ उठवणार्‍या हॉस्पिटलचे कोव्हिड रुग्णांसाठी अधिग्रहण करण्यास विरोध करणार्‍या डॉक्टर व राजकीय पुढार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी प्रांताधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

esahas.com

चोरीचा मुद्देमाल विकण्यास आलेला सराईत चोरटा जेरबंद

कोळकी, ता. फलटण येथील बसस्थानक परिसरात चोरी केलेला मुद्देमाल विकण्यास आलेल्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दागिने व डीव्हिडी प्लेअरसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

esahas.com

पीडितांच्या न्यायासाठी स्वतंत्र विशेष न्यायालयाची स्थापना करावी

अत्याचार पीडित अल्पवयीन मुली व स्त्रियांना त्वरित न्याय मिळण्यासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र विशेष न्यायालय मिळण्याबाबत व फाशी सारख्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी होण्यासाठी कायद्यात योग्य ते बदल करण्याबाबत मराठा क्रांती मोर्चा, फलटण यांनी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन दिले.

esahas.com

मोबाईल चोरल्याप्रकरणी अनोळखी महिलेवर गुन्हा

दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेने दुकानातील कामास असलेल्या महिला कर्मचार्‍याचा मोबाईल चोरल्याची घटना शहरातील एका चप्पल दुकानात घडली असून, अनोळखी महिलेच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

‘धनगर समाजा’तर्फे फलटण प्रांताधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन 

पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त फलटण तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या विविध मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे दिले.

esahas.com

फलटण पालिकेचे दोन सफाई कर्मचारी कोरोनाबाधित

फलटण नगरपरिषदेमध्ये काम करणार्‍या दोन सफाई कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने नगरपरिषदेमध्ये एकच खळबळ उडाली असून, फलटण नगरपरिषद कार्यालय चोवीस तासांकरिता बंद करण्यात आले आहे.