कराड : स्वर्गीय माजी खासदार आनंदराव चव्हाण काका व स्वर्गीय माजी खासदार प्रमिलाताई चव्हाण काकी व स्वर्गीय रामचंद्र राघोजी पाटील (दादा)यांच्या संयुक्त स्मृतिदिनानिमित्त प्रेमिलाकाकी माध्यमिक विद्यालय विजयनगर ता.कराड येथे स्व. काका-काकी व दादा यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्मृतीदिना निमित्ताने वृक्षारोपण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास माजी आमदार आनंदराव पाटील (नान...
कराड : आठ महिने वयाच्या मुलास पोटाला बांधुन २३ वर्षीय महिलेने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना कासारशिरंबे ता. कराड येथील पालकराचा मळा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. राजश्री शंकर रासकर वय २३, मुलगा शिवतेज वय ८ दोघे रा. कडेगाव जि. सांगली अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याबाबत वनिता बबन दगडे वय ४० रा. काटकर मळा, कासारश...
शेतक-यांना समजून घेवून, निर्णय घेवून राबविले नाहीत तर शेतक-यांचा दिल्लीला पडलेला वेढा प्रत्येक राज्यात पडेल व सध्या केंद्र सरकारला शेतक-यांनी वेढीस धरले आहे. याचा आनंद मानणारे कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस इत्यादी विरोधकांनाही शेतक-यांचा वेढा पडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र सरकारला शेतक-यांच्या आंदोलनाची झळ बसलेली नाही.महाराष्ट्र सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत तर त्रिकोणी सरकारला शेतकरी तिलांजली देतील. महाराष्ट्र सरकारच्या आमदार, मंत्री, सरकारी अधिकारी यांचेपेक्षाही शेतक-यांना स्वत
जिल्ह्यात वाढत्या कोरोना बाधित संख्येमुळे लॉकडाऊन कडक करणे प्रशासनाला गरजेचे होते. परंतु यामधून किराणा दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळायला हवी जेणेकरून सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढला जाईल. तसेच व्यापाऱ्यांनी सुद्धा दुकाने सुरु झाल्यानंतर प्रशासनाने दिलेल्या निर्बधांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण कोरोना काळात नियमांचे पालन करणे हेच सर्वांच्या हातात आहे. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
विजयनगर ग्रामपंचायतीने गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. या विलगीकरण कक्षात उपलब्ध सोयी, सुविधा व उपचार पहाता हे विलगीकरण कक्ष रोड मॉडेल - माजी आमदार आनंदराव पाटील
सातारा : सातारा जिल्ह्याला आतापर्यंत 72 हजार 890 कोव्हॅक्सिन व 6 लाख 29 हजार 270 कोविशिल्ड लस उपलब्ध झालेली आहे. इथून पुढे उपलब्धतेनुसार पुरवठा करण्यात येईल हे सांगून भविष्यात येऊ घातलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधी घ्यावयाच्या खबरदारी व करावयाच्या उपाययोजना बाबत दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी केल्या. सातारा येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या ...
मालखेड ता.कराड येथे ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत माहिती ग्रामस्थांना दिली. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.गावातील गर्दीची ठिकाणी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण कर...
गेल्या काही दिवसांत दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असून, ही सकारात्मक बाब आहे. मात्र तज्ज्ञांनी पुन्हा तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून, या लाटेचा सामना करण्यासाठीही कृष्णा हॉस्पिटल सज्ज आहे. कोरोना साथीचे गांभीर्य ओळखून रूग्णांनी स्वत:च घरात उपचार घेत न बसता, दवाखान्याशी संपर्क साधून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रूग्णालयात अथवा घरात उपचार घ्यावेत, डॉ. सुरेश भोसले, अध्यक्ष कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट
"सध्या सातारा जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा असताना जनतेच्या सुरक्षिततेसाठी सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने त्वरित लस खरेदी करून लोकांसाठी लसीकरणाची सोय केली आहे. केंद्र सरकारने खासगी हॉस्पिटलना लस खरेदीची परवानगी दिल्यानंतर सह्याद्री हॉस्पिटल हे सातारा जिल्ह्यातील एकमेव खासगी रुग्णालय आहे ज्यांनी लस उपलब्ध केली आहे. " - विश्वजित डुबल, मार्केटिंग मॅनेजर
या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले २००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनी ब्रिटन, आखाती देशांसह देशविदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. मुंबईतील लिलावती हॉस्पिटल आणि अंबानी हॉस्पिटलने नर्सिंग स्टाफच्या भरतीसाठी कृष्णा नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन, या महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रशंसा केली आहे. - डॉ. वैशाली मोहिते