Karad

esahas.com

पोलिसाला जखमी करून पसार झालेल्या सराईतांपैकी एक अटकेत; कराड शहर पोलिसांची कारवाई

कृष्णा कॅनाॅल (कराड) जवळ इनोव्हा कारमधून पळून जाताना पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत पोलिसाला जखमी करून पसार झालेल्या सराईतांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली. ओगलेवाडी पोलिसांनी रहिमतपूर येथे ही कारवाई केली.

esahas.com

मालखेडनजीक अज्ञात चोरट्यांनी पोकलॅन चालक व कामगाराला लुबाडले

मालखेड, ता. कराड येथे अज्ञात चोरट्यांनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून पोकलॅन मशिनवरील परप्रांतीय चालकासह त्याच्या कामगाराकडून सुमारे 25 हजाराचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी 7 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घडली. याबाबत पारसनाथ आवधेश कुमार यादव यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

कराड नगरपालिकेच्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर

स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत कराड नगरपालिकेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ हॉटेल, हॉस्पिटल, शासकीय कार्यालय, शाळा, मार्केट, स्वच्छ सोसायटी आदींचे मूल्यांकन व गुण प्रदान करून या स्पर्धेचा निकाल जाहीर  करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

esahas.com

शिपायास दारूच्या नशेत शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी क्लार्कला सहा महिन्यांची शिक्षा

मलकापूर नगरपालिकेच्या क्लार्कने शिपायास दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच शासकीय कर्मचार्‍याला त्याच्या कर्तव्यामधून रोखल्याप्रकरणी कराड येथील जिल्हा सत्र न्यायाधीश रविकांत टी. साखरे यांनी एकास सहा महिने कैद व 12 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

esahas.com

रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर गुन्हा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या दहा ते बारा जणांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी 9 रोजी रात्री शहर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

esahas.com

राज्य सरकारच्या जीआरची होळी करू

शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून टनामागे 10 रुपये कपात करून तो निधी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला देण्याचा जीआर राज्य शासनाने काढला आहे. परंतु, राज्यात अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारथी व आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकार पैसे देते. मग ऊसतोड महामंडळाला शेतकऱ्यांनी का पैसे द्यावेत? हा प्रश्न आहे.

esahas.com

महाआघाडी सरकार पत्रकारांसाठी सकारात्मक

पत्रकारांनी अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन आदी. आपत्तीसह कोरोनासारख्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून काम केले. परंतू, राज्यात पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडत असून दोन वर्षात त्यासंबंधीचे कायदे अधिक कडक करण्यात आले आहेत.

esahas.com

मलकापूरात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरु

मलकापूर नगरपालिका कार्यक्षेत्रामधील 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी 8 रोजी येथील नुतन मराठी प्राथमिक शाळेत मलकापूर नगरपालिका व काले प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून संयुक्तरित्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

esahas.com

कराडात विनामास्क वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

शहरात नगरपालिका आणि पोलिसांनी गुरुवारी विनामास्क वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. या संयुक्तिक मोहिमेत अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी शहरात अचानकपणे करण्यात आलेल्या कारवाईमुळे अनेक वाहनचालकांची पंचाईत झाल्याचे दिसून आले.

esahas.com

ओगलेवाडीत बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी युवकास अटक

ओगलेवाडी, ता. कराड येथे बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगणार्‍या युवकास पोलिसांनी अटक केले. बुधवार दि. ५ रोजी दुपारी ओगलेवाडी चौक येथील भाजी मंडई परिसरात कारवाई करण्यात आली. मुबिन युन्नुस पटेल (वय 26) रा. हजारमाची ता. कराड असे बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.