maharashtra

शिपायास दारूच्या नशेत शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी क्लार्कला सहा महिन्यांची शिक्षा


Clark sentenced to six months in prison for abusing and beating a soldier under the influence of alcohol
मलकापूर नगरपालिकेच्या क्लार्कने शिपायास दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच शासकीय कर्मचार्‍याला त्याच्या कर्तव्यामधून रोखल्याप्रकरणी कराड येथील जिल्हा सत्र न्यायाधीश रविकांत टी. साखरे यांनी एकास सहा महिने कैद व 12 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

कराड : मलकापूर नगरपालिकेच्या क्लार्कने शिपायास दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच शासकीय कर्मचार्‍याला त्याच्या कर्तव्यामधून रोखल्याप्रकरणी कराड येथील जिल्हा सत्र न्यायाधीश रविकांत टी. साखरे यांनी एकास सहा महिने कैद व 12 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
शशिकांत पांडुरंग राजे रा. आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड असे शिक्षा झालेल्याचे नावे आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शशिकांत राजे हा मलकापूर नगरपालिकेमध्ये क्लार्क या पदावर कार्यरत आहे. पालिकेच्या शिपायाने तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती दळवी यांच्या आदेशानुसार कार्यादेश घेऊन जाण्यासाठी क्लार्क राजे यास 30 मार्च 2020 रोजी दुपारी फोन केला. यावेळी राजे याने शिपायास फोनवर शिवीगाळ करून फोन बंद केला. त्यानंतर थोड्यावेळाने राजे याने दारूच्या नशेत नगरपालिकेत येऊन शिपायास कार्यादेश देण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत राजे विरोधात शहर पोलिसात शिपायाने फिर्याद दिली होती. त्यावरून राजे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सहायक सत्र न्यायाधीश रविकांत टी. साखरे यांचे समोर खटल्याची सुनावणी करण्यात आली. सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. झालेल्या साक्षीपुराव्यावरून व सहायक जिल्हा सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश रविकांत साखरे यांनी आरोपीस दोषी धरून सहा महिने कैद व 12 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. कराड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. एल. शिरोळे यांनी सखोल तपास केला असून केस कामी पोलीस हवालदार मदने, माने, कार्वेकर यांनी सहकार्य केले.