maharashtra

कराडात विनामास्क वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

नगरपालिका व पोलिसांची संयुक्तिक मोहीम : अनेक वाहनचालकांना प्रत्येकी 500 रूपयांचा दंड

Action against unmasked drivers in Karad
शहरात नगरपालिका आणि पोलिसांनी गुरुवारी विनामास्क वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. या संयुक्तिक मोहिमेत अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी शहरात अचानकपणे करण्यात आलेल्या कारवाईमुळे अनेक वाहनचालकांची पंचाईत झाल्याचे दिसून आले.

कराड : शहरात नगरपालिका आणि पोलिसांनी गुरुवारी विनामास्क वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. या संयुक्तिक मोहिमेत अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी शहरात अचानकपणे करण्यात आलेल्या कारवाईमुळे अनेक वाहनचालकांची पंचाईत झाल्याचे दिसून आले.
येथील दत्त चौकात गुरुवारी ६ रोजी सायंकाळी नगरपालिका आणि शहर व वाहतूक पोलिसांनी विनामास्क वाहनचालकांवर संयुक्तिकरित्या कारवाईची मोहिम राबवली. सातारा जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार शहरात विना मास्क वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम सूरू करण्यात आली.
यामध्ये नगरपालिकेच्या आरोग्य विभागासह कराड वाहतूक पोलिस आणि शहर पोलिसांचा समावेश होता. या संयुक्तिक पथकाने विना मास्क फिरणार्‍या वाहनचालकांवर प्रत्येकी 500 रूपयांचा दंड आकारण्यात आला. सायंकाळच्या सुमारास येथील दत्त चौकात शहरातून बाहेर जाणाऱ्या आणि शहरात प्रवेश करणाऱ्यांची मोठी गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तिकरित्या याठिकाणी विना मास्क फिरणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.