पुण्यात बेदरकारपणे बस चालवून नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले संतोष माने प्रकरण अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. असाच प्रकार आज वडूज येथे घडला. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख तसेच शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानाने हा अनुसूचित प्रकार टळला आणि अनेकांचे जीव वाचले.
सातारा शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वाक्षरी करुन मंजुरी दिली. हद्दवाढ झाल्याचे पत्र आज अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रराजेंना सुपूर्द केले. या निर्णयामुळे सातारा नगरपालिका ही ’क’ वर्ग महानगरपालिकेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.
जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून दिवसभरात 25 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी दिवसभरात 621 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 19,609 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
जननी चॅरिटेबल ट्रस्ट मलकापूर यांच्यातर्फे पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर साहित्याचे वितरण ग्रामपंचायत खिंगर व भिलार येथे करण्यात आले.
सोमवारी सकाळी पुसेगाव येथून आले काढणीसाठी निघालेला टेम्पो औंध येथे आल्यानंतर खबालवाडी रस्त्याकडे जाणार्या पुलाजवळ पलटी झाल्याने टेम्पोतील 25 वर्षीय युवक व 13 वर्षीय मुलगी जागीच ठार झाली आहे. ठार झालेले संबंधित कामगार हे मध्यप्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, यामध्ये बाधितांच्या मृत्यूचेही प्रमाण जास्त आहे. सोमवारी (दि. 7) दिवसभरात जिल्ह्यात सर्वाधिक 25 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूने पाचशेचा आकडा ओलांडला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णसंख्येचा वेग सातारकरांना चिंतेत टाकू लागला आहे. रविवारीदेखील 498 बाधित आढळून आले तर 15 रुग्णांचा उपचारादररम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केली असून, आज पाचगणी पोलिसांनी मास्क न घालता फिरणार्या नागरिक व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
पवारवाडी, ता. फलटण या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, प्रशासनाकडून पवारवाडीमध्ये योग्य ती दखल घेऊन मास्क न लावणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असताना पवारवाडीतील मास्क न वापरणार्या नागरिकांवर दंडुकांची कारवाई केली जात आहे.
राज्य सरकारने ई-पास रद्द केल्यामुळे नागरिकांच्या गर्दीमुळे पाचगणी शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पालिका हद्दीतील विविध पॉइंटस् सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आले आहेत.