क्रीडा

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात दिवसभरात 732 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 38 कोरोनाबाधितांचा उपचादररम्यान मृत्यू झाला तर 732 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 30,824 इतकी झाली आहे तर आजपर्यंत 20,250 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात दिवसभरात 977 कोरोनाबाधित

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. शनिवारी दिवसभरात 977 जण कोरोनाबाधित झाले तर 21 जणांचा उपचादरम्यान मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे 809 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 19,866 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

esahas.com
क्रीडा

डाळमोडीत औषधे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून कोरोनाग्रस्तांना दिलासा

खटाव तालुक्यात बहुतांशी गावात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सुरुवातीच्या काळात एखाद्या गावात रुग्ण आढळून आला की त्या ठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी आदींसह इतर अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा त्या गावात जाऊन गावातील प्रमुख पदाधिकार्‍यांना खबरदारीच्या सूचना देत होता.

esahas.com
क्रीडा

पाचगणीत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी

कोरोनाचे संकट कोसळल्याने शासनाने 20 मार्चपासून पूर्णतः लॉकडाऊन करून पर्यटकांना बंदी घालण्यात आली. गेली सहा महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने पर्यटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाचगणी शहरातील बहुतांशी लोकांचे जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून असल्याने पॉइंटवरील व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी टेबललँड व्यापारी असोसिएशनच्यावतीने पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

esahas.com
क्रीडा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून एक लढा उभारू

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील आपल्या गावात, वाडी-वस्तीवर आलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना आपल्या कुटुंबातील लोकांची माहिती द्या. घरातील कोणत्याही व्यक्तीला थंडी, ताप, खोकला व तत्सम आजाराची लक्षणे दिसून येत असतील तर त्याची कल्पना देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून एक लढा उभारू,’ असे प्रतिपादन फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या रेश्माताई भोसले यांनी केले.

esahas.com
क्रीडा

नरवणे परिसरात मुसळधार पावसाने पिके भुईसपाट

माण तालुक्यातील नरवणेसह दोरगेवाडी, काळेवाडी तसेच गटेवाडी परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली बाजरी, कांदा व मका आदी पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून, संबंधित पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

esahas.com
क्रीडा

कोरोनाला हरवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी

‘कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. आत्तापर्यंत देशात लाखो लोक मरण पावले आहेत. त्या संकटाला समोर जाण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत केली पाहिजे,’ असे आवाहन माण-खटावच्या प्रांताधिकारी अश्‍विनी जिरंगे यांनी केले. 

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात आणखी 962 कोरोनाबाधित

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात 962 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची एकूण रुग्णसंख्या आता 29,115 इतकी आहे. तर दि. 18 रोजी उच्चांकी 1280 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

esahas.com
क्रीडा

पत्रकारांना तत्काळ विमा संरक्षण द्यावे 

कोरोनाचा हाहाकार वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांना इत्थंभूत माहिती मिळावी, यासाठी प्रयत्न करणारे पत्रकार विमा संरक्षणापासून वंचित राहत आहेत. यासाठी आज मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी विमा योजना तत्काळ सुरू करावी, याबाबत तहसीलदार आर. सी. पाटील यांना फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांनी निवेदन दिले. व ठरल्याप्रमाणे आरोग्य मंत्र्यांना एसएमएस केले.

esahas.com
क्रीडा

मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने घेतलेली भरारी सर्वांसाठी अभिमानास्पद

‘आज जगात भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली बलाढ्य देश म्हणून पुढे येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली रोजगार, शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय, उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रात देशाने घेतलेली भरारी आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी व विशेषतः युवा पिढीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांनी केले.