‘लोक न्यायालय ही लोकाभिमुख चळवळ आहे. त्यामुळे आर्थिक आणि वेळेची मोठी बचत होत असून, दोघा पक्षकारांमधील समेटामुळे त्यांच्यात ऋणानुबंध निर्माण होतो. त्याचबरोबर भांडणात वेळ गेल्याने कुटुंबाची खुंटलेली प्रगती लोक न्यायालयातील समेटामुळे पक्षकाराला साधता येते. त्यामुळे लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत,’ असे अवाहन तालुका विधी सेवा संघाचे अध्यक्ष दिवाणी व फौजदारी न्यायाधीश शैलेश कंठे यांनी केले.
सहकार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल येथील दि वाई अर्बन को ऑप. बँकेचे अध्यक्ष सीए चंद्रकांत काळे यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते लेक्सिकॉन भारत लीडरशीप अॅवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.
लसीकरणासाठी पहिल्या गटात सरकारी आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवरील कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.
विटा : मानसिंग को ऑप बँकेचा फाऊंडेशन डे साजरा करण्यात आला, फाऊंडेशन डे निमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी काही ना काही तरी सामाजिक कार्य करण्यात येते यावेळी दुधोंडी येथील स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले होते, यावेळी स्मशानभूमीची स्वच्छता करून जी गतवर्षी वृक्षारोपण केले होते त्याची स्वच्छता करून त्या वृक्षांना लागवड सोडून मान्यवरांच्या हस्ते पाणी घ...
राज्यातील नागरिकांना करोनावरील लस मोफत देण्यात येईल. लसचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार उचलेल. आम्ही केंद्र सरकारच्या आदेशाची वाट पाहतोय. केंद्राने हिरवा कंदिल दाखवताच सर्व प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल, असं पिनराई विजयन यांनी सांगितलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजय दिवस समारोह स्थगीत करण्यात आला आहे. मात्र जवानांच्या सन्मानार्थ आणि राज्यातील रक्ताचा तुटवडा विचारात घेवुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विजय दिवस समारोह समितीच्यावतीने मंगळवारी (ता. १५) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी दिल्ली: देशात लसीकरणाची (Covid-19 Vaccination) जोरात तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला प्रत्येक सत्रात फक्त १०० लोकांना लशीचा डोस दिला जाणार आहे. लशीची उपलब्धता आणि तयारी उत्तम झाली तर ही संख्या २०० पर्यंत पोहोचू शकणार आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनीस्ट्रेशनने (NEGVAC) यासाठी तपशीलवार गाइडलाइन तयार केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एक विशेष पथक या ११२ पानी गाइडलाइ...
‘आधुनिक शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकरी मेळावा मार्गदर्शक ठरेल. याद्वारे शेतकर्यांना फायदा होईल,’ असे मत तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 88 बाधितांची नोंद झाली असून, 7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 2 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या माझा सातारा या पुस्तिकेचे प्रकाशन आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले.