महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळी वेण्णालेक नजीक दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन महिला किरकोळ तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमींवर वाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नीलेश भगवान राजाणे (रा. रुपवली (गोलेकोंड) ता. महाड) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नानासो लक्ष्मण इंगळे (वय 40, रा. देऊळगावसिद्धीकी, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 61 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 120 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
कराड, ः शहरातील कृष्णा नका परिसरात असलेल्या मारुती मंदिराजवळ युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात वातावरण तणावपूर्ण आहे. दरम्यान जखमेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत. मिलिंद कृष्णत शिंदे (वय 21, रा. बुंधवार पेठ) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे, असे उपजिल्ह...
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 65 बाधिताची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 4 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 124 बाधितांची नोंद झाली असून, तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 60 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
संघटनेचा हस्तक्षेप टाळणार कराड आगारात संघटनेचा कोणताही हस्तक्षेप विचारात घेतला जाणार नाही. कोणत्याही संघटनेची कामात ढवळाढवळ चालू दिली जाणार नाही. कर्मचार्यांवर कोणताही अन्याय होवू दिला जाणार नाही. कर्मचार्यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा त्याच्यांवर कारवाई केली जाईल. तसेच जे अधिकारी पदाचा तसेच अधिकारांचा गैरवापर करतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. कोणावर अन्याय होवू नये यांची काळजी घेणार असल्याचे आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 64 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 30 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
कराड येथील भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेच्यावतीने महावितरण विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले. महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून 4 कोटी जनतेला आधारात टाकण्याचे पाप करणार्या महावितरणच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराड दक्षिणचे अध्यक्ष धनाजी पाटील, उपाध्यक्ष प्रशांत ...
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 64 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 37 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये बी. ए.च्या द्वितीय वर्षात शिकणारी व माण तालुक्यातील जाशी गावची ऋतुजा शांतीलाल पाटील हिची अवघ्या 19व्या वयात ‘झुळूक’ नावाची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. तिने साहित्य क्षेत्रात ‘युवा लेखिका’ म्हणून पदार्पण केल्याबद्दल तिचा दै.‘मुक्तागिरी’ व ‘मुक्तांगण’ परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.