पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती सातारा आणि पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 परळी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी येथे दि. 26 फेब्रुवारी रोजी पशुचिकित्सा शिबिर पार पडले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांची जन्मभूमी असलेल्या माण तालुक्यातील पळसावडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेजश्री रमेश यादव यांची तर उपसरपंचपदी दादासो उत्तम डोंबाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
निमसोड (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महेंद्र देशमुख तर उपसरपंचपदी शीतल सांगवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कोरेगाव शहर विकास मंचच्या वतीने मंचचे अध्यक्ष व कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे विद्यमान संचालक किशोर बर्गे यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त डॉ. शीतल गोसावी यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला.
‘संत नामदेवांपासून नारायण सुर्वेंपर्यंत समृद्ध साहित्य परंपरा असणारी मराठी अभिजात दर्जाला पात्र आहे. श्रमिक वंचित कष्टकर्यांच्या जगण्याला शब्दरूप देण्याचे व्रत मराठीने अंगीकारले आहे. हे आपल्या भाषेचे व संस्कृतीचे वेगळेपण होय,’ असे प्रतिपादन कवयित्री कुंदा लोखंडे-कांबळे यांनी केले.
सातारा, दि. 27 ः प्रेम, विश्वास, आदर, काळजी, आपुलकीच्या आधारावर सुखी संसार सुरू असतानाच एखादे वादळ येऊन संसाराची गाडी भरकटते. इगो, संशय, मत्सर, अविश्वास अशा अनेक कारणांनी संसारामध्ये भांडणे लागतात. ही भांडणे चार भिंतीत न राहता अनेकदा संसार मोडण्याची वेळ येते. अशावेळी दोन्ही बाजू समजून घेऊन समझोता करणार्या हक्काच्या आणि विश्वासू संस्थेची गरज असते. पोलीस दलाच्या ‘भरोसा सेल’ने आपले नाव सार्थ करून दाखवत गेल्या वर्षभरात 46 व यावर्षीच्या 9 अशा 55 जणांचा संसाराची गाडी पुन्हा रुळावर आणली आहे.
मांडवे (ता. खटाव) येथील उपसरपंच पदाची निवड अतिशय चुरशीने झाली. या निवडीत प्रस्थापित नेतृत्वाला शह देत गावचे युवा नेते व सातारा जि. प. चे चतुर्थश्रेणी कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम खाडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने गावामध्ये ‘नवीन युवा पर्वा’चा उदय केला आहे.
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 117 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 98 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सज्जनगडावरील दासनवमी महोत्सवास शनिवार (दि. 27) पासून सुरुवात झाली असून, यात्रेचा मुख्य दिवस दासनवमी ही सात मार्चला होत आहे. यंदाचा दासनवमी महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा होणार आहे, अशी माहिती ‘समर्थ रामदास स्वामी संस्थान’चे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी व समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी यांनी दिली.
‘गेली 35 वर्षे पक्षांशी एकनिष्ठ राहून कार्य केल्यानेच मनोहर बर्गे यांना काँग्रेस पक्षाने निष्ठेचे फळ दिले,’ असे प्रतिपादन कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक तथा कोरेगाव विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे यांनी व्यक्त केले.