sports

‘कोरेगाव शहर विकास मंच’तर्फे डॉ. शीतल गोसावी यांचा सत्कार


कोरेगाव शहर विकास मंचच्या वतीने मंचचे अध्यक्ष व कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे विद्यमान संचालक किशोर बर्गे यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त डॉ. शीतल गोसावी यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला. 

कोरेगाव : कोरेगाव शहर विकास मंचच्या वतीने मंचचे अध्यक्ष व कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे विद्यमान संचालक किशोर बर्गे यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त डॉ. शीतल गोसावी यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी किशोर बर्गे म्हणाले, ‘कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस हे आघाडीचे शिलेदार म्हणून कार्य करीत होते. कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकजण आपापल्या परीने आपली जबाबदारी मोठ्या धैर्याने पार पाडीत होते. कोरोना आवाक्याबाहेर होत चालल्याने खासगी डॉक्टर्स सुद्धा देशावरील संकटाचा सामना करण्यासाठी आपापल्या परीने रुग्णसेवा करीत होते. कोरेगाव येथील गोसावी हॉस्पिटलमध्ये सुद्धा महामारीला न भीता समाजसेवा हिच ईश्‍वरसेवा मानून डॉ. गोसावी दाम्पत्य काम करीत होते. डॉ. शीतल गोसावी यांचे कोरोना नियंत्रणासाठी केलेले कार्य उल्लेखनीय कार्याची पोहोच पावती म्हणून त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.’

सत्काराला उत्तर देताना डॉ. शीतल गोसावी यांनी किशोर बर्गे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून शासन व किशोर बर्गे यांच्या सारखे सेवाभावी लोक आमच्या पाठीशी होते म्हणूनच आम्ही न भुतो ना भविष्यती अशा कोरोना महामारी संकटाचा सामना करू शकलो, असे सांगितले. प्रसंगी आम्हालाही विलगीकरणात जावे लागले तरीही आम्ही रुग्णसेवा करीत राहिल्याने आज आमचे कार्य उल्लेखनीय ठरले.