sports

मनोहर बर्गे यांना काँग्रेसच्या निष्ठेचे फळ मिळाले

किशोर बर्गे यांचे प्रतिपादन : ‘कोरेगाव शहर विकास मंच’तर्फे बर्गेंचा सत्कार

‘गेली 35 वर्षे पक्षांशी एकनिष्ठ राहून कार्य केल्यानेच मनोहर बर्गे यांना काँग्रेस पक्षाने निष्ठेचे फळ दिले,’ असे प्रतिपादन कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक तथा कोरेगाव विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे यांनी व्यक्त केले.

कोरेगाव : ‘गेली 35 वर्षे पक्षांशी एकनिष्ठ राहून कार्य केल्यानेच मनोहर बर्गे यांना काँग्रेस पक्षाने निष्ठेचे फळ दिले,’ असे प्रतिपादन कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक तथा कोरेगाव विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदावर नव्याने निवड झालेल्या मनोहर बर्गे यांचा कोरेगाव विकास मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते  बोलत होते.

किशोर बर्गे म्हणाले, ‘स्व. आमदार दत्ताजीराव बर्गे यांच्यापासून आजअखेर बर्गे कुटुंबीय काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. यापूर्वी स्व. दत्ताजीराव बर्गे यांनी सुद्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद भूषविले होते. 35 वर्षे पक्षाशी प्रामाणिक राहून काँग्रेस विचारधारा जनमानसात रूजवित लोकांची कामे मार्गी लावणार्‍या मनोहर बर्गे यांची जिल्हा कमिटीवर झालेली निवड निश्‍चितच स्तुत्य आहे. त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष वाढीचे काम अधिक प्रभावीपणे होईल,’ असा विश्‍वासही किशोर बर्गे यांनी व्यक्त केला.

सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मनोहर बर्गे म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या प्रश्‍नांना नेहमी प्राधान्य दिले. पक्षाशी प्रामाणिक राहिल्यानेच ही संधी मिळाल्याचे सांगून काँग्रेस विचार अधिक भक्कम करण्याचा यापुढेही प्रयत्न राहील.’

यावेळी कोरेगाव विकास मंचच्या वतीने मनोहर बर्गे यांचा पेढे, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 

या कार्यक्रमास कोरेगाव विकास मंचचे सदस्य, नागरिक उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रशांत भोसले यांनी आभार मानले.