क्रीडा

esahas.com
क्रीडा

कोरेगावात कोरोनाविषयक नियमांना तिलांजली

कोरेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख वाढतच चालला आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने केलेले नियम पाळले जात नसल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत चालली आहे. प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल, पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी संयुक्त कारवाई करत दहा दुकानांसह एक कोचिंग क्लास सील केला. 

esahas.com
क्रीडा

ट्रॅव्हल बसमध्ये सोन्या-चांदीचे 29 लाखांचे दागिने हस्तगत

ट्रॅव्हलबसमधून सोन्या-चांदीची चोरटी वाहतूक होत असल्याचे समजताच भुईंज पोलिसांनी आनेवाडी टोलनाक्यावर नाकाबंदी केली व रात्री तीनच्या सुमारास ट्रॅव्हल बसच्या डीकीतून सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम असा 29 लाख 62 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

esahas.com
क्रीडा

भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहराच्या वैभवात भर

‘फलटण शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहराच्या वैभवात भर पडलेली आहे. भूमिपूजन करत असलेल्या मलनि:स्सारण केंद्रामुळे फलटण तालुक्यातील शेजारी व सर्वसामान्य नागरिकांना वापरायचे पाणी उपलब्ध होणार आहे,’ असे मत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

esahas.com
क्रीडा

सातारा तालुक्यातील सहा शाळांच्या वर्गखोल्या बांधण्यास मंजुरी

आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून सातारा तालुक्यातील सहा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या नवीन आठ वर्ग खोल्या बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.

esahas.com
क्रीडा

कोरोनाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधाची प्रभावी अमंलबजावणी करा

‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने जे-जे निर्बंध घातले आहेत, त्या निर्बंधाची जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी करा,’ अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केल्या.

esahas.com
क्रीडा

सातारा जिल्हा क्षयरोग विभागाला उल्लेखनीय कार्याबद्दल देशपातळीवर ‘ब्रॉन्झ’ पदक

जगभरात क्षयरोग (टीबी) झपाट्याने वाढत असून, त्यामध्ये भारताचा अव्वल क्रमांक आहे. जगाच्या तुलनेत 27 टक्के रुग्ण भारतात असून महाराष्ट्रात हे प्रमाण 10 टक्के आहे, अशी सध्याची क्षयरुग्णांची सद्य:स्थिती आहे. असे असताना सातारा आरोग्य विभागाने क्षयरोग निर्मूलनासाठी कंबर कसली असल्याने, त्यांच्याच कार्याची पावती म्हणून क्षयरोग उच्चाटनासाठी करत असलेल्या कार्याबद्दल ब्रॉन्झ पदक भारत सरकारतर्फे प्रदान करण्यात आले असून, ही सातारा जिल्ह्याकरिता अभिमानास्पद बाब असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील य

esahas.com
क्रीडा

क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील चाचणी लॅबची क्षमता वाढवावी

‘सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आढळत आहे. त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत. तसेच स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवा,’ अशा सूचना विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.

esahas.com
क्रीडा

बुध गावची ‘रोलमॉडेल’च्या दिशेने वाटचाल

‘गेल्या तीन वर्षांत बुधचे लोकनियुक्त सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी कोट्यवधीची विकासकामे केल्यामुळे बुध गाव रोलमॉडेलच्या दिशेने वाटचाल करीत असून, बुधचा लवकरच कायापालट होईल,’ असा विश्‍वास शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

esahas.com
क्रीडा

फलटण तालुक्यात लॉकडाऊन न करता अन्य उपाययोजना राबवाव्यात

फलटण शहर व तालुक्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने लॉकडाऊन न करता अन्य उपाययोजना प्रभावीरितीने राबवाव्यात, या प्रमुख मागणीचे निवेदन अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष फलटणच्या वतीने प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांना देण्यात आले.

esahas.com
क्रीडा

मायणी वनक्षेत्राला शॉर्ट सर्किटमुळे आग

मायणी (ता. खटाव) येथील पक्षी आश्रयस्थानाला नुकताच मायणी पक्षी संवर्धनाचा दर्जा मिळाला असून, हे मायणी पक्षी संवर्धन महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. जवळपास 65 हेक्टर क्षेत्र असलेल्या या पक्षी संवर्धन/वनक्षेत्राला गुरुवारी (दि. 1) सकाळी अकरा वाजता शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीवर वन कर्मचारी, मायणीतील युवक व ग्रामस्थांकडून वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मायणीची वनसंपदा बचावली आहे.