sports

कोरेगावात कोरोनाविषयक नियमांना तिलांजली

10 दुकानांसह एक कोचिंग क्लास सील; महसूल, पोलीस व नगरपंचायत प्रशासनाची संयुक्त कारवाई 

कोरेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख वाढतच चालला आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने केलेले नियम पाळले जात नसल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत चालली आहे. प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल, पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी संयुक्त कारवाई करत दहा दुकानांसह एक कोचिंग क्लास सील केला. 

कुमठे : कोरेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख वाढतच चालला आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने केलेले नियम पाळले जात नसल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत चालली आहे. प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल, पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी संयुक्त कारवाई करत दहा दुकानांसह एक कोचिंग क्लास सील केला. 

तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून, सर्वसामान्य जनता नियम पाळत नाही, दुकानदारांसह व्यापारी व व्यावसायिक आस्थापना, कोचिंग क्लासेसमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले होते. 

गुरुवारी दुपारी प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. त्यामध्ये प्रशासन कारवाई करत नसल्याबद्दल व आरोग्य विभाग पुरेसे प्रयत्न करत नसल्याबद्दल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी स्वत: कारवाई करणार असल्याचे सांगितले. 

बैठकीनंतर ज्योती पाटील यांच्यासह मुख्याधिकारी विजया घाडगे, निवासी नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, विठ्ठल काळे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचार्‍यांनी मुख्याधिकारी विजया घाडगे, निवासी नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, विठ्ठल काळे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचार्‍यांनी जुना मोटार स्टँड, आझाद चौक, रहिमतपूर रस्ता, मॅफको परिसरात कारवाईला सुरुवात केली. नियमांचे उल्लंघन करत असलेल्या दुकानदारांना जाब विचारत त्यांच्यावर दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. सायंकाळपर्यंत दहा दुकाने आणि एक कोचिंग क्लास सील करण्यात आला. 

कारवाई सत्र सुरुच राहणार : ज्योती पाटील
कोरेगाव, रहिमतपूर, वाठार स्टेशन, सातारारोड, वाठार किरोली, तारगाव, पिंपोडे बुद्रुक, भाडळे, चिमणगाव परिसरासह शहरी आणि ग्रामीण भागात महसूल, पोलीस, नगरपंचायत आणि ग्रामविकास प्रशासनाची संयुक्त मोहीम यापुढेच सुरूच राहणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर ज्योती पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.