कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात आज दुपारी दोनच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी लावत अक्षरशः गारांचा पाऊस झाला आहे. रस्त्यावर आणि शेतात बर्फाचा खच साठला होता. मात्र, गारपिटीमुळे कांदा उत्पादक, कलिंगड व द्राक्षबागांबरोबर इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
‘राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असताना रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनास प्रतिसाद देण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका व शहर यांनी मंगळवारी (दि. 13) फलटण येथे समाजाची गरज ओळखून आयोजित केलेले रक्तदान शिबिर कौतुकास्पद आहे,’ असे मत फलटण-कोरेगाव
गोडोली गावाची यात्रा दरवर्षी उत्साहाने साजरी होत असते. मात्र, या वर्षी कोरोना महामारीच्या संकटातून वाचण्यासाठी गर्दी टाळणे महत्वाचे आहे. कोरोनाचा शिरकाव गोडोलीत होवू नये, याची काळजी घेण्यासाठी यंदा गोडोलीची यात्रा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय गोडोली यात्रा कमिटी आणि शहर पोलीस ठाणे यांच्या बैठकीत झाला. गोडोलीचे देवस्थान भैरवनाथाचे मानकरी नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी ही माहिती दिली.
शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीतील मंगळवारपेठ बोगदा येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय ऊर्फ पिल्या राजू नलवडे वय 30 वर्ष रा. मंगळवार पेठ सातारा वारंवार गुन्हे करण्यात सरसावलेला असल्याने त्यास सातारा जिल्हयातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव शाहुपुरी पोलीस ठाणेकडून पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फत उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) सातारा यांचेकडे पाठवण्यात आला होता. प्रस्तावाची सुनावणी पुर्ण होवून मिनाज मुल्ला उपविभागीय दंडाधिकारी यांनी विजय ऊर्फ पिल्या राजू नलवडे यास सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरीता तड
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सातारा जिल्ह्यात वळीव पावसाची हजेरी ही सातत्याने पाहायला मिळते. कुठे सोसाट्याच्या वार्यासह तर कोठे गारांचा सडा असेच काहीसे चित्र दिसत आहे.
बदामी रंगाच्या आयशर प्रो कंपनीचा चार चाकी टेम्पो क्र. (एमएच 50/8333) या गाडीत गोवंशीय जातीची अंदाजे एक ते दोन महिने वयाची बारा जर्सी गायची वासरे कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने डांबून ठेवलेली मिळून आली असून, तौफिक इम्तियाज कुरेशी (रा. कुरेशीनगर, फलटण) यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पशु छळ अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे 10 लाख 24 हजारांचा मुद्देमाल फलटण शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे.
जगभरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव पाचगणी शहर व परिसरात झाला असून, नुकतेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक विठ्ठल (तात्या) बगाडे यांचे आकस्मित निधन झाल्याने दरवर्षी धूमधडाक्यात सार्वजनिकरीत्या साजर्या होणार्या या वार्षिक आनंदोत्सवावर विरजण पडले आहे. त्यामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती बुधवारी (दि. 14) शहरात साधेपणाने साजरी करण्यात आली.
सालपे, ता. फलटण येथील सालपे घाटात चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आतील मालासह ट्रक पळवून नेणारी 11 जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा पोलिस आणि लोणंद पोलिसांनी संयुक्तरित्या ही कामगिरी यशस्वी करत चोवीस तासात गुन्ह्याचा छडा लावला व सर्व 11 आरोपींना अहमदनगर, सांगली जिल्हयातील वेगवेगळया ठिकाणाहून अटक करुन चोरीस गेलेला संपूर्ण 14.59 लाखांचा मुद्देमालदेखील हस्तगत केला.
मोळ (ता. खटाव) व डिस्कळ, पसूचामळा या ठिकाणी बुधवारी दुपारी जोरदार गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्य शासन निर्णयानुसार पाणंद रस्ते खुले करून ग्रामस्थांना वाहतुकीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला सोमंथळी ग्रामपंचायत योग्य प्रतिसाद देत नसल्याने त्या प्रश्नाकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी शिवाजी धोंडिराम सोडमिसे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंदिरात बेमुद उपोषण सुरू केले आहे.