क्रीडा

esahas.com
क्रीडा

ओझर्डेचे सुपूत्र जवान सोमनाथ तांगडे यांना सिक्कीम येथे वीरमरण

ओझर्डे (ता. वाई) येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय 38) यांना सिक्कीम येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले. तांगडे यांच्या जाण्याने ओझर्डेसह वाई तालुक्यात शोककळा पसरली आहे.

esahas.com
क्रीडा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या सदस्या यांचे पती रामचंद्र कोंडीबा सुतार व मुलगा अनिकेत सुतार, दीर लक्ष्मण कोंडीबा सुतार यांच्यासह साहिल राजू ओबळे, रविंद्र विश्‍वनाथ ओंबळे, निखिल उर्फ अनिकेत राजू ओबळे (सर्व रा. केंडबे) यांच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

esahas.com
क्रीडा

ना. बाळासाहेब पाटील यांनी संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर केली सातारा शहराची पाहणी

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने कडक निर्बंध घातले आहे. या निर्बंधांच्या अंमलबजावणीची पाहणी आज पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केली.

esahas.com
क्रीडा

फलटणमधील सोने-चांदी व्यापार्‍याचे रिंगरोडवरील रस्त्यावर अतिक्रमण

संपूर्ण फलटण शहरासह रिंग रोडवरील अनेक अतिक्रमणे हटवून फलटण नगरपरिषदेने बराचसा श्‍वास मोकळा केला आहे. मात्र याचवेळी ज्वेलरीचे भलेमोठे शोरूमचे अतिक्रमण रिंगरोड वरील रस्त्यावर आल्याचे दिसत असून, याकडे नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत  असल्याची चर्चा फलटणकर नागरिकांमधून होत आहे. या अतिक्रमणाला राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.

esahas.com
क्रीडा

सातार्‍यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नवीन 78 बेडची उभारणी

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलात 78 बेडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, त्याची पाहणी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केली.

esahas.com
क्रीडा

हस्तनपूरच्या उजाड माळरानावर वनविभागाने फुलवली वनराई..!

हस्तनपूर (ता. माण) येथील 50 हेक्टर उजाड माळरानावर वनविभाग दहिवडी यांनी विविध प्रकारची 31250 वृक्ष लावून त्यांना चार टँकरने नियमित पाणी देऊन वनराई फुलवली आहे. या वनराईसाठी हस्तनपूर ग्रामस्थांचेही मोठे सहकार्य वनविभागाला मिळत असल्याने ऐन उन्हाळ्यात वनराई हिरवीगार दिसून येत आहे.

esahas.com
क्रीडा

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देऊ

उत्तर कोरेगाव तालुक्यात बुधवारी झालेल्या गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. भांडवली खर्च असलेली पिके पूर्णपणे वाया गेली असून,  नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन आ. दीपक चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर शेतकर्‍यांना दिले.

esahas.com
क्रीडा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांना हक्क मिळवून देणारे ‘घटनापती’

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित, बौद्धांचे नेते असून त्यांनी फक्त दलितांसाठी काम केले, हा जो इतर धर्मियांमध्ये गैरसमज आहे तो आज 74 वर्षे झाली तरी फुसला जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे. खरेतर या महामानवाने पृथ्वी तलावर असलेल्या अठरापगड जाती जमातीच्या पुरुष, महिला, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, कामगार महिला पुरुष यांचे हक्क घटनेच्या माध्यमातून मिळवून देणारे जगातील एकमेव घटनापती आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही,’ असे मत पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी व्यक्त केले.

esahas.com
क्रीडा

दुष्काळी माण तालुक्यातील केसर आंबा निघाला दुबईस..

दुष्काळी माण तालुक्यातील खडकी येथील हरिभाऊ व प्रमोद वेदपाठक या शेतकरी बंधूंनी शासकीय अनुदान योजनेतून लागवड केलेल्या आंबा फळ बागेतील दहा टन केसर आंबा दुबईस विक्रीसाठी निर्यात करण्यात आला.

esahas.com
क्रीडा

फलटणमध्ये संचारबंदीच्या अनुषंगाने पोलीस, महसूल व पालिका प्रशासनाचे संचलन

फलटण शहर आणि तालुक्यात संचारबंदीच्या पहिल्या दिवशी कुठं शुकशुकाट तर कुठं वर्दळ असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे संचारबंदी आदेशाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन, महसूल व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण शहरात संचलन करून नागरिकांना संचारबंदी आदेशाच्या नियमांची अंमलबजावणी बाबत आवाहन करण्यात आले.