sports

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पंचायत समिती सदस्याच्या पतीसह सहाजणांवर पोक्सोंतर्गत गुन्हा : चौघांना अटक

सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या सदस्या यांचे पती रामचंद्र कोंडीबा सुतार व मुलगा अनिकेत सुतार, दीर लक्ष्मण कोंडीबा सुतार यांच्यासह साहिल राजू ओबळे, रविंद्र विश्‍वनाथ ओंबळे, निखिल उर्फ अनिकेत राजू ओबळे (सर्व रा. केंडबे) यांच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

सातारा : सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या सदस्या यांचे पती रामचंद्र कोंडीबा सुतार व मुलगा अनिकेत सुतार, दीर लक्ष्मण कोंडीबा सुतार यांच्यासह साहिल राजू ओबळे, रविंद्र विश्‍वनाथ ओंबळे, निखिल उर्फ अनिकेत राजू ओबळे (सर्व रा. केंडबे) यांच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

सहा वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर वर्षभर सातत्याने अत्याचार होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर जावळी तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघांना तत्काळ अटक केली आहे. संबधित संशयितांनी सहा वर्षीय चिमुकलीला शेतात, राहत्या घरात, वैरणीच्या गंजी जवळील झोपडीत जीवे मारण्याची धमकी तर कधी चॉकलेटचे आमिष दाखवून गेले एक वर्षभर अत्याचार केल्याची फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबधित मुलीला संशयित खेळण्यासाठी व खाऊ देण्यासाठी बोलवून नेत होते. त्यानंतर निर्जनस्थळी अत्याचार करत असत. हा सर्व प्रकार लहान मुलीने आपल्या घरात सांगितल्यानंतर कुटुंबियांनी थेट मेढा पोलिस स्थानकात धाव घेतली आणि घटनाक्रम सांगितला. यावरून केडंबे येथील अमानुष अत्याचार करणारे पंचायत समितीचे विद्यमान सदस्यांचे पती, मुलगा आणि दीर यांच्यासह इतर एकूण सहा जणांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये चार संशयितांना अटक केली आहे. अन्य दोघे फरार आहेत. या संदर्भात अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने करत आहेत.