जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोकांची झोप उडाली आहे. वाढत्या संख्येने मन धास्तावले आहेत. गजबजणार्या बाजारपेठा सुद्धा नि:शब्द होऊ लागल्या आहेत. बाधितांचा जिल्ह्याचा रोजचा आकडा हजाराच्या घरात जाऊ लागला आहे. गावे सुद्धा हॉटस्पॉट बनू लागली आहेत. एकीकडे गावागावांत ही संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहेत. तर दुसरीकडे रोजी रोटीचे साधन बंद झाल्याने छोटे-मोठे व्यावसायिक परिस्थितीने निरुत्तर झाले आहेत.
ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून एका जेष्ठ कोरोना बाधित रुग्णाने पलायन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोनच दिवसापुर्वी आमदार दीपक चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाने कारभार सुधारावा असे फटकारले असतानाच हा गंभीर प्रकार घडल्याने येथील गचाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या निमित्ताने इन्सिडंट कमांडर तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप दोषींवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या फलटणमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आगामी काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. फलटणमध्ये असणार्या आरोग्य यंत्रणेवर आता ताण येऊ लागला आहे. फलटणमध्ये सध्या बेड्स मिळणे सुद्धा अवघड झालेले आहे. हे जाणूनच फलटणकरांच्या मदतीला उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे हे धावून आले आहेत. नंदकुमार भोईटे यांच्या सजाई गार्डन मंगल कार्यालयात नंदकुमार भोईटे यांनी स्वखर्चाने 100 बेड्स असलेले कोरोना केअर सेंटर उभारून प्रशासनाकडे हस्त
कोरोना महामारीमुळे बहुतांशी लोक स्वतःचा जीव मुठीत घेऊन घरी बसले आहेत. तर दुसर्या बाजूला काहीजण स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा पैकीच एक आहेत वडूज नगरपंचायतीचे शववाहिनेचे चालक मनोज पवार. त्यांनी रविवारी एकाच दिवशी सुमारे अडीचशे किलोमीटरचा प्रवास करत तब्बल 9 कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारास हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.
‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला बहुमोल असे संविधान दिले आहे. त्या संविधानातून निर्माण झालेल्या कायद्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळेच आज सर्व भीम अनुयायी शांततेच्या मार्गाने भीमजयंती साजरी करत आहेत, ही खरोखरंच अभिमानाची गोष्ट आहे,’ असे मत बाळासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले.
पुस्तकांचे गाव म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या भिलार गावात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी भिलार ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवार, दि. 16 एप्रिल ते मंगळवार, दि. 27 एप्रिलपर्यंत दहा दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला असून, या पाठोपाठ तालुक्याच्या पूर्व भागातील गोडवली, खिंगर, आंब्रळ व राजपुरी या चार गावांतील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने दि. 19 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला आहे.
बुधवारी सायंकाळी तब्बल अर्धा तास झालेल्या गारपिटीने आटपाडी शहराचा भाग असलेल्या 22 किमी वरील शेंडगेवाडीत झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी केली.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अथक जीवन कार्य म्हणजे असामान्य कर्तृत्वाचा दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचार कार्याने मानवी जगण्याला नवी उमेद आणि सामर्थ्य प्राप्त होते आहे,’ असे मत आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासिका डॉ. दीपा श्रावस्ती यांनी व्यक्त केले.
पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोना विषाणूमुक्त वातावरण सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाची फवारणी करत विषाणूमुक्तीचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
कोरोना या महामारीची दहशत गेल्या वर्षी पासून माण तालुका भोगत आहे. गत मार्चमध्ये म्हसवड व परिसरात कोरोनाची मोठी दहशत होती.आठ महिने म्हसवड व परिसरातील नागरिकांनी या महामारीची दहशत मनावर घेत 35 लोकांचे जीव घेतल्यानंतर या महामारीने आपला मोर्चा दहिवडी व परिसराकडे वळवला. दहिवडीत म्हसवड पेक्षा मोठी दहशत होती. या दहशतीने दहिवडीत डोकेवर काढल्याने माण तालुक्यातील बाधितांच्या मृत्यूच्या संख्येने शतक पार करून 141 आकडा गाठला असताना पुन्हा या कोरोनाने दुसर्या लाटेत आपला मोर्चा म्हसवडकडे वळवून म्हसवडकरांची झो