क्रीडा

esahas.com
क्रीडा

लिंबच्या विकासासाठी खा. उदयनराजेंकडून 15 लाखांचा निधी

‘खा. उदयनराजे भोसले यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत समाजकारण केले आहे. लिंब गावातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी त्यांनी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने रस्त्याचे काम मार्गी लागले असून, आतापर्यंत खा. उदयनराजे भोसले यांनी गावातील विकासकामांसाठी 70 लाख रुपयांचा निधी दिला आहे,’ अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी यांनी दिली. 

esahas.com
क्रीडा

दुष्काळी भागातील दुग्ध उत्पादक शेतकरी भाव घसरल्याने तोट्यात

माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्‍यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.

esahas.com
क्रीडा

मेमन यांचा आदर्श महसूल विभागातील कर्मचार्‍यांनी घ्यावा

‘कोरोना काळात महसूल विभागाच्या कर्मचारी व अधिकार्‍यांचे योगदान महत्त्वाचे आहे. केळघर येथे मंडलाधिकारी म्हणून काम करत असताना प्रशासकीय कामाबरोबरच कोरोना काळात राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये मंडलाधिकारी ए. ए. मेमन यांचा सहभाग कौतुकास्पद होता. त्यांचा आदर्श महसूल विभागातील कर्मचार्‍यांनी घ्यावा,’ असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी केले.

esahas.com
क्रीडा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुसेगावात आजपासून सहा दिवस ‘जनता कर्फ्यू’

शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने पुसेगावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या गावात बाजारपेठेतील काही व्यापार्‍यांसह तब्बल 51 जण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असल्याने बुधवार, दि. 21 पासून सोमवारपर्यंत सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय पोलीस, ग्रामपंचायत, व्यापारी आणि दक्षता समितीने घेतला.

esahas.com
क्रीडा

दिगंबर आगवणे जमीन विकून उभारताहेत 100 ऑक्सिजन बेड्सचे कोविड सेंटर

आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे हे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कायमच धावून येतात व सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कायम उभे राहत असतात. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी बेड्स उपलब्ध होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणूनच दिगंबर आगवणे यांनी फलटण-सातारा रोडवरील पूर्वीच्या शाईन एक्स्प्रेस लाँड्री येथे 100 ऑक्सिजनचे बेड्स तयार करीत आहेत. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यात ऑक

esahas.com
क्रीडा

खटाव तालुका बनतोय ‘कोरोना’चा ‘हॉट स्पॉट’

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यात खटाव तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. सध्या गावोगावी विविध उपाययोजना करून देखील रुग्ण आटोक्यात येण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने खटाव तालुका कोरोनाचा हॉट स्पाट बनतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यत: भोसरे, खटाव, वडूज, पुसेगाव, औंध आदी गावांत कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोना थोपवण्यास पुढाकार घेतला पाहिजे. 

esahas.com
क्रीडा

ट्रकमालकाच्या अपघाती मृत्यूबद्दल  तब्बल 1.15 कोटींची नुकसान भरपाई

ट्रकचा टायर फुटल्याने त्याची धडक समोरून येणार्‍या कंटेनरला बसली होती. या अपघातात कंटेनर चालवत असणार्‍या ट्रकमालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने मयत ट्रकमालकाच्या वारसांना तब्बल 1.15 कोटींची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

esahas.com
क्रीडा

1 मे पासून 18 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस

करोना विरोधात देशाच्या सुरू असलेल्या लढाईच्यादृष्टीन केंद्र सरकारे आज एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता 18 वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस दिल्या जाणार आहे. 1 मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. याशिवाय लस उत्पादकांना 50 टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे.

esahas.com
क्रीडा

वडजल येथे जुगार अड्डयावर छापा

वडजल, ता. फलटण येथे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 1 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

esahas.com
क्रीडा

विनापरवाना गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी एकास अटक

फरांदवाडी (ता. फलटण) येथे तावडी फाट्यावर आज दुपारी फलटण शहर पोलिसांनी दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. निखिल सतीश कदम (वय 26, रा. झडकबाईचीवाडी, ता. फलटण) याच्या ताब्यात असलेली मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी क्र. (एमएच 11 सीजी 4840) मधून प्रतिबंधित असलेले अन्न पदार्थ (विमल नावाचा गुटखा) एकूण किंमत रुपये 1,95,000 सह विनापरवाना वाहतूक करीत असताना मिळून आला आहे. त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ व गाडी असे मिळून 4,95,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.