दिगंबर आगवणे जमीन विकून उभारताहेत 100 ऑक्सिजन बेड्सचे कोविड सेंटर
गरजू रुग्णांवर होणार योग्य उपचार : सामाजिक बांधिलकीचं होतंय कौतुक
आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे हे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कायमच धावून येतात व सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कायम उभे राहत असतात. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी बेड्स उपलब्ध होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणूनच दिगंबर आगवणे यांनी फलटण-सातारा रोडवरील पूर्वीच्या शाईन एक्स्प्रेस लाँड्री येथे 100 ऑक्सिजनचे बेड्स तयार करीत आहेत. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यात ऑक
फलटण : आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे हे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कायमच धावून येतात व सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कायम उभे राहत असतात. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी बेड्स उपलब्ध होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणूनच दिगंबर आगवणे यांनी फलटण-सातारा रोडवरील पूर्वीच्या शाईन एक्स्प्रेस लाँड्री येथे 100 ऑक्सिजनचे बेड्स तयार करीत आहेत. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यात ऑक्सिजन बेड्स कमी पडत आहेत.
ऑक्सिजन बेड्ससाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना विविध वशिले लावावे लागत आहेत. अशामध्ये तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसाठी युवा नेते दिगंबर आगवणे हे स्वतः अडचणीत असताना सुद्धा फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी 100 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देत आहेत. येथे सर्वसामान्य नागरिकांना बेड्स हे प्राध्यानाने दिले जातील अशी ग्वाही, आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे यांनी यावेळी दिली.
फलटण तालुक्यातील ऑक्सिजन बेड्ससाठी प्रत्येक रुग्णांचे नातेवाईक काळजीत आहेत. अनेकवेळा येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी व नातेवाईक यांच्यात वादाचे प्रसंग उपस्थित राहत आहेत. मात्र, जे-जे प्रयत्न करायला पाहिजे, ते-ते सर्व प्रयत्न येथील कर्मचारी करीत आहेत. अधिकाधिक नातेवाईक बेड उपलब्धतेबाबत विचारपूस करीत आहेत. तर, रेमडेसिवीर इंजेक्शनसाठीही अनेकांचे फोन येथे येत आहेत. त्यामुळे कर्मचारी उपलब्धतेनुसार त्यांना माहिती देत आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड्स उपलब्ध व्हावेत, यासाठी मी स्वतः 100 ऑक्सिजन बेड्स उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती युवा नेते दिगंबर आगवणे यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून युवा नेते दिगंबर आगवणे हे स्वतः आर्थिक अडचणीत आहेत. सध्या ही ते आर्थिक अडचणीत असताना फलटणमधील सर्वसामान्य जनतेसाठी स्वतःची जमीन विकून 100 ऑक्सिजन बेड्स उभारण्याचा निर्णय दिगंबर आगवणे यांनी घेतलेला आहे. सर्वोत्तम उपचार देण्यासाठी आगामी काळामध्ये आपण कटिबद्ध आहे व कटिबद्धच राहू, अशी ग्वाही युवा नेते दिगंबर आगवणे यांनी दिली.