covidcenternews

esahas.com

डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या प्रयत्नातून चैतन्य रुग्णालय कोविडसाठी हस्तांतरित

गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील ब्रह्मचैतन्य देवस्थान ट्रस्टचे चैतन्य रुग्णालय प्रशासनाने कोविड सेंटरसाठी अधिगृहित केले होते. विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या प्रयत्नातून देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या सहकार्याने आज चैतन्य रुग्णालय लोकांच्या सेवेसाठी कोविड सेंटर म्हणून आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली.

esahas.com

रुग्णसेवेसाठी पुष्कर कोविड केअर सेंटर पुन्हा सज्ज

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. जम्बो कोविड केअर सेंटर, सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खासगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतूने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी पुष्कर मंग

esahas.com

दिगंबर आगवणे जमीन विकून उभारताहेत 100 ऑक्सिजन बेड्सचे कोविड सेंटर

आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे हे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कायमच धावून येतात व सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कायम उभे राहत असतात. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी बेड्स उपलब्ध होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणूनच दिगंबर आगवणे यांनी फलटण-सातारा रोडवरील पूर्वीच्या शाईन एक्स्प्रेस लाँड्री येथे 100 ऑक्सिजनचे बेड्स तयार करीत आहेत. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यात ऑक