मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) व ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 एप्रिल 2021 रोजी मासभवन येथे कोविड लसीकण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कोरोनाच्या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव तसेच लोकांच्या बेफीकीरपणामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन जोरात फैलावतोय. बाधित रुग्णांचे प्रमाण दररोज वाढत असल्याने त्याला वेळीच रोखण्याकरिता पाचगणी नगरपरिषद शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केली जाणार असून, काही लक्षणे दिसून आल्यास अशा लक्षणे असलेल्यांची नावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देऊन त्यांची तपासणी करून पाचगणी शहरात वाढणार्या कोरोनाला प्रतिबंध घातला जाणार आहे.
‘सोना अलाईज कंपनीच्या माध्यमातून 21 टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत असून, लवकरात लवकर किमान 3 जिल्ह्यांतील गरजूंना याचा उपयोग होणार आहे,’ अशी माहिती विधान परिषदचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांंनी दिली.
‘खटाव तालुक्यात दररोज सरासरी किती नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. सद्य:स्थितीतील उपाययोजना, उपलब्ध साधन सामग्री याचा आरोग्य विभाग व प्रशासनाने रोजच्या रोज आढावा घ्यावा. तसेच रुग्ण व नातेवाइकांची इतर ठिकाणी होणारी धावपळ कमी करण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहन आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने निढळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत कृती समितीने बुधवार, दि. 21 रात्री 8 वाजल्यापासून 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
फलटण तालुक्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील मलटण परिसरात कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. नगरसेवक अशोकराव जाधव यांचा पुढाकारातून व श्री कृपा सिंधू स्वामी समर्थ सेवा मंडळ, मलटण यांच्या माध्यमातून येथील स्वामी समर्थ मंदिर येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.
‘कोविड लसीकरणासाठी रजिट्रेशन करणे महत्त्वाचे आहे, अजूनपर्यंत तरी लसीकरणासाठी रजिट्रेशन करण्याची टक्केवारी कमी आहे. लस संपली म्हणून कर्मचार्यांनी न थांबता लसीकरणासाठी शंभर टक्के रजिस्ट्रेशन केलेच पाहिजे, असे म्हणत ‘हागणदारी मुक्त गाव’ या अभियानासारखे ‘कोरोनामुक्त गाव’ असे फलक गावाबाहेर लागावेत,’ अशी आशा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी व्यक्त केली.
मुंबईहून कोल्हापूर याठिकाणी 24 हजार लिटर पेट्रोल-डिझेल भरून निघालेल्या टँकरचे पाठीमागील टायर फुटून लागलेल्या आगीमध्ये टँकरचे साधारणपणे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करून रोख रक्कम व ऐवज लुटणार्या योगेश मदने याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
‘कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करून शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा,’ अशा सूचना गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज पोलीस विभागाला केल्या.