उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांच्या आदेशान्वये वडूज शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वडूज नगरपंचायत व प्रशासकीय अधिकार्यांनी शहरामध्ये शुक्रवार, दि. 23 ते 30 एप्रिलअखेर ‘जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला असून, याबाबतचा निर्णय हुतात्मा स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
‘गेल्यावर्षी आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवलं होत. त्यावेळी हा अनुभव पूर्णपणे नवा होता. अनपेक्षित शत्रूशी दोन हात करत असताना शासकीय यंत्रणा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळाले होते. आपल्यावर पुन्हा एकदा तीच वेळ आली असून स्थानिक प्रशासन, नागरिकांनी कोरोनाबद्दल संवेदनशील राहून कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे,’ असे मत आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने प्रशासनाने नियम आवळायला सुरुवात केली आहे. तरीही जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत सातारा शहर पोलिसांनी सहा व्यवसायिकांवर तर बोरगाव पोलिसांनी एका व्यवसायियकावर कारवाई करण्यात आली आहे.
‘कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन धोक्यात आले आहे. कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी शासनाने जे नियम घालून दिले आहेत. त्याचे काटेकोर पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. आपला देश कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, तसेच परळी भागातील रुग्णांना दर्जात्मक सोयीसुविधा देण्यास प्राधान्य ठेवावे तसेच रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी सर्वांनीच शर्तीचे प्रयत्न केले पाहिजेत,’ असे आवाहन आ. शिवेंद
कोरोना सारख्या महाभयंकर वैश्विक आजारासाठी प्रशासनाने कोळकी येथील स्मशानभूमी अधिग्रहण केली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढत असताना लोकांचे मयत होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. रोज कोळकीचे स्मशानभूमीमध्ये 8 ते 10 लोकांचे मृत्यू झालेले येत आहेत व त्या ठिकाणी दहन केले जात आहे. यामुळे या परिसरातील वाडी-वस्तीवर महिला, पुरुष व लहान मुलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. रोज मृत्यूच्या तांडव बघत असल्यामुळे स्मश
राज्यात उद्या रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
कोरेगाव शहर आणि तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धडक कारवाईस सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 101 वाहनांवर कारवाई करत 20 हजारांहून अधिक दंड वसूल केला आहे. शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने खळबळ उडाली आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयातील अपुर्या कर्मचारी वर्गाचा फटका आता कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये चांगलाच बसू लागला आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारीच नसल्याने याठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांनाच अन्य कर्मचार्याला सोबत घेऊन कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह उचलावे लागत आहेत.
शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यालगत रस्त्याच्या कडेला मद्यपान करत बसलेल्या दोघांना सहाजणांनी गळ्याला कोयता लावून 1 लाख 73 हजारांची रोकड, मोबाईल, किंमती घड्याळ असा एकूण दोन लाखाचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेल्याची खळबळजनक उघडकीस आली.
महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, फलटण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास 43 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कर्तव्य केले आहे.