भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजअखेर कोणताही न्याय सवलत व इतर सुविधा न मिळणारा समाज म्हणजे महाराष्ट्रातील घडशी समाज असून, सध्या कोरोनामुळे आमच्या समाजातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार यांनी केली आहे.
‘कोरेगाव तालुक्यातील एकंबे, बिचुकले आणि नलवडेवाडी (बिचुकले) या गावांची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे होती, मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनी या गावातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट, ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था उपलब्ध करून देत चांगला निर्णय घेतला आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
सातारा : आपल्या सीएसआर कटिबद्धतेचा भाग म्हणून सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने (एसपीएन) वृक्षारोपण प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी स्वयंसेवी संस्था सेट्रीज सोबत सहयोग केला आहे. एसपीएन व सेट्रीज यांनी सहयोगाने महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त सातारा जिल्ह्यामधील तीन एकर जमिनीवर घनदाट वनीकरणाच्या माध्यमातून ८००० हून अधिक विविध रोपट्यांच्या स्थानिक प्र...
पाडळी (निनाम, ता. सातारा) येथील मानाच्या सासनकाठीचे तसेच पोषाखाचे आज पारंपरिक प्रथेनुसार पूजन करण्यात आले. मात्र, सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीमुळे वाडी रत्नागिरीकडे होणारा प्रस्थान कार्यक्रम रद्द करण्यात आला.
मांडवे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर चंदनशिवे यांची बिनविरोध निवड झाल्याने अखेर गावास गावकारभारी मिळाला.
कराड : येत्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण बहुऊद्देशीय हॉल, वडगाव हवेली ग्रामीण रुग्णालय, उंडाळे ग्रामीण रुग्णालय या 3 ठिकाणी 110 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे व येथेच कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. यापुढेही जशी गरज पडेल तशी बेड संख्या वाढविले जातील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊन ऑक्सिजन च्या तुटवड्याबाबत यावर उपाय म्हणून सरकारी जागांमध्ये ऑक्सि...
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. जम्बो कोविड केअर सेंटर, सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खासगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतूने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी पुष्कर मंग
जरंडेश्वर नाका, सातारा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून 35 हजार 280 रुपयांच्या देशी दारूच्या 48 बाटत्या तसेच अॅक्टिव्हा मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पंकज उर्फ दीपक ज्ञानेश्वर पवार रा. मोरे कॉलनी, मंगळवार पेठ, सातारा याला सीआरपीसी नुसार नोटीस बजावली आहे.
सातारा : सोनगाव तर्फ सातारा येथे एकाच्या शेतात बेकायदेशीर अतिक्रमण करून ताली-बांध तोडून दीड लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पांडुरंग केशव नावडकर, प्रकाश जाधव, शिवाजी महादेव धोंडवड सर्व रा. सोनगाव तर्फ सातारा अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत हणमंतराव रामराव घाडगे वय 63, संभाजीनगर, सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आह...
‘जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवाव्यात तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, असा रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार याची खबरदारी घ्यावी,’ अशा सूचना विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.