कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील सर्व भाजीमंडई आणि रस्ते शनिवारपासून बंद करण्यात येणार आहेत. सध्या संचारबंदीची योग्य अंमलबजावणी होत असूनही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने नियम आणखी आवळण्याचा निर्णय पोलीस प्रशासन आणि सातारा नगरपालिकेकडून घेण्यात आला आहे.
कारी (ता. सातारा) येथील विलास जगन्नाथ भातुसे (वय 45) यांच्या घराला सुमारे 2.30 ते 3च्या दरम्यान अचानक आग लागल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आले. घरातील दस्तऐवजासह गहू, ज्वारी, हरभरा यांसह जवळपास 100 कोंबड्या आगीत जळून खाक झाल्या. सदर घटनेत विलास भातुसे यांच्या पायाला भाजले असता अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
‘वनांना वारंवार लागणारी आग (वणवे) रोखण्यासाठी विविध ठिकाणी जाळ रेषा निर्मिती करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनांचे किती महत्त्व आहे, हे समाजाला वनविभागाने पटवून देऊन वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोनाग्रस्त सहायता समिती, टास्क फोर्स बनवण्यात आला आहे.
‘कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतल्यास या संकटावर मात करणे अवघड नाही. ग्रामस्तरावर लोकांनी स्वत:हून पुढाकार घेतल्यास संसर्गाची चेन ब्रेक होण्यास मदत होईल. परंतु, हे काम करत असताना कोणी गावचे राजकारण पुढे आणू नका, असे करणार्याला पाप लागेल,’ असे मत खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी व्यक्त केले.
‘मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच या नगरीचे सर्वप्रकारचे प्रश्न ज्या-त्या वेळी सोडवले आहेत. सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील प्रमुख शहर असलेल्या मेढा नगरीचा कायापालट करण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असून, या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
काटवली (ता. जावली) दापवडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या उपकेंद्राला इमारतीसाठी निधी उपलब्ध व्हावा व या उपकेंद्रात आरोग्य अधिकार्याची नेमणूक करावी,अशी मागणी काटवली व दापवडी ग्रामस्थांनी आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना महामारीच्या संकटा बरोबर महागाईचा सामना करावा लागतं आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात गत दिवाळीपासून सत्तर टक्याने वाढ झाली असून, सध्याचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने मासिक किराणा साहित्य व महिलांचे बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना, सामन्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे.
विटा-महाबळेश्वर राज्यमार्गाचे केळघर बाजारपेठेत रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून, पावसाळ्यापूर्वी रुंदीकरणाचे काम मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बेलोशे यांनी दिला आहे.
‘सातारा जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेमध्ये सध्या मनुष्यबळ खूप कमी आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने आरोग्य विभागास काम करण्यास अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यापेक्षा नागरिकांनीच स्वतःची काळजी घ्यावी, हाच कोरोनावर एकमेव उपचार,’ असा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिला आहे.