देऊर-बिचुकले गावांना जोडणारा पक्का रस्ता व्हावा, ही गेली अनेक वर्षांपासूनची दोन्ही गावांची मागणी अखेर मंजूर झाली असून 2800 मी. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. लवकरच या दोन्ही गावांना जोडणारा मजबूत रस्ता तयार होणार आहे. यामुळे शेती तसेच शालेय मुले, नोकरदार लोकांचा प्रश्न सुटणार आहे.
संपूर्ण देशात व महाराष्ट्रात वाढत्या रुग्णसंख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी, यासाठी म्हासुर्णे कोरोना दक्षता कमिटी व म्हासुर्णे पोलीस पाटील संभाजी माने यांनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्यास गावातील नागरिक आणि व्यापार्यांनी पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे बाजारपेठेसह सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.
पुणे जिल्ह्यातील एका आमदाराला युवतीच्या साह्याने हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळण्याचा कट तिघा युवकांनी रचला होता. परंतु, संबंधित युवतीनेच आमदारांच्या पुतण्याला याची माहिती दिल्याने कट उघडकीस आला.
‘कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असताना सहकार क्षेत्रातील अग्रेसर असणारी शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि., शिवथरने सन 2020-2021 या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. विविध अडचणीवर मात करत शिवशक्ती पतसंस्थेने आपला प्रगतीचा आलेख उंचावत ठेवून संस्थेची परंपरा कायम राखली आहे. सन 2020-2021 या आर्थिक वर्षात संस्थेत ढोबळ नफा 2 कोटी 4 लाख झाला असून निव्वळ नफा 1 कोटी 18 लाख झाला आहे,’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रभाकर साबळे यांनी दिली.
कोरेगाव विधानसभा मतदार संघातील कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यांतील विविध गावांमधील मूलभूत सुविधांच्या कामासाठी 25/15 मधून पाच कोटी रुपयांची तरतूद ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरी स्वतंत्र विलगीकरणाची सोय नाही, अशा नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दोन हॉटेल ताब्यात घेतली असून, ही सोय नाममात्र शुल्कात देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया काल पार पडली. या प्रक्रियेत राष्ट्रवादी चिन्हावर निवडून आलेले पांडुरंग जवळ यांची नगराध्यक्षपदी तर कल्पना जवळ यांची उपनगराध्यक्षपदी निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोपान टोंपे यांनी केली. निवडणूक प्रक्रियेसाठी त्यांना तहसीलदार राजेंद्र पोळ व मुख्याधिकारी अमोल पवार यांनी सहकार्य केले.
सातारा-लातूर महामार्गावर शहरातील साखळी पुलानजीक बाबुलाल लुणिया यांच्या चप्पल-बूट विक्री दुकानाला दुपारी 4च्या सुमारास आग लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीमुळे दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली. लगतची सर्व दुकाने आगीपासून वाचली.
जिल्ह्यात संचारबंदी कडक केली असली तरी काहीजणांना अत्यावश्यक, वैद्यकीय, अंत्यसंस्कार कार्यक्रम अशा कारणांसाठी आंतरजिल्हा किंवा शहरांतर्गत प्रवास करावा लागतो. त्यांना परवानगी देण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ऑनलाईन ई-पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात कोवीड ई-पास कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती पोनि विजय कुंभार यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी वजा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.