राज्य उत्पादन शुल्क, साताराच्या भरारी पथकाने पांडे, ता. वाई आणि नायगाव, ता.कोरेगाव येथे छापे टाकून अवैधरित्या दारू विक्रीच्या बाटल्या व दोन कार असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
‘दुष्काळी माण तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकर्यांनी यंदा मोठ्या कष्टाने व जिद्दीने यश मिळविल्यामुळेच येथील आंब्यास परदेशात मागणी वाढू लागली व निर्यातही होऊ लागला,’ असे मत माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
सातारा : जिल्हाधिकार्यांचे आदेश धाब्यावर बसवून भुईंज परिसरात गुपचूप दारू विक्री करणार्या दोन ठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापे टाकून गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत माहिती अशी, भुईज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले हॉटेल राजयोग, परमीट रुम बिअर बार येथे हॉटेलचे शटर अर्धे उघडे ठेवून दारूची विक्री चालू असल्याची तसेच विरमाडे गावच्या हद्दीतील देशी-विदेशी दारूची चोरटी विक्री सुरू अस...
लोणंदजवळील येथील शिरवळ रोडवर मरिआईची वाडी फाटा या ठिकाणी गोमांस घेऊन चाललेली गाडी गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पकडून लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सैदापूर, ता. सातारा येथे तुंबलेल्या गटाराच्या सफाईचे काम थांबवण्याच्या कारणावरून महिला ग्रामपंचायत सदस्येला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. सुधाकर गोविंद थोपटे व जावेद शौकत चावडीवाले रा. दोन्ही सैदापुर, ता. जि. सातारा अशी दोघांची नावे आहेत.
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दिलेले आदेश धाब्यावर बसवणार्या सातार्यातील दोन व्यापार्यांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल बाळासो पवार वय 27 वर्षे रा. यवतेश्वर ता. जि. सातारा आणि संतोष किसन जाधव वय -45 वर्षे रा अंबवडे, ता. सातारा अशी त्यांची नावे आहेत.
दानवली (ता. महाबळेश्वर) येथे शासकीय शिधा वाटपात निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याने आज नागरिक संतप्त झाले होते. असले निकृष्ट दर्जाचे धान्य देण्याऐवजी ते देऊ नका, अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
दरे तर्फ परळी येथील महादेव गोविंद तुपे यांचे घर डोंगराला लागलेल्या वणव्याच्या आगीत जळून खाक झाले आहे. यामध्ये दोन कडब्याच्या गंजी तसेच गोठ्यात बांधलेल्या तीन गाई भाजून जखमी झाल्या होत्या. त्यातील दोन गाई मृत झाल्या आहेत. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले आहे.
लोणंद येथील पोलाद निर्मिती करणार्या सोना अलॉज कंपनीतील बंद असलेला ऑक्सिजन प्लांट कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू करण्यात आला.
शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने उत्तर खटावमधील खटाव, पुसेगाव, निढळ, बुध या बाजारपेठेच्या गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ज्या-त्या गावातील ग्रामस्तरीय दक्षता समितीने 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.