सातारा : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाबंदीची घोषणा केली आहे. त्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात आज गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सातारा-पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील सारोळा चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केली व जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा, अशा सक्त सूचनाही त्यांनी पोलिसांना यावेळी केल्या. संचारबंदीच्या...
सातारा व पुणे जिल्हयात महामार्गावरील जोडरस्त्यावर लुटमार करणार्या योगेश मदने टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. याच टोळीतील फरार असलेल्या सराईत आरोपीला एलसीबीच्या पथकाने फलटण तालुक्यातील ताथवडा घाटात दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून शिताफीने जेरबंद केले. किरण मदने असे त्याचे नाव आहे.
‘सध्या फलटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांना सध्या फलटणमध्ये कोरोना उपचारासाठी बेड्स मिळत नाहीत. अशी सर्व परिस्थिती असताना माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे स्वखर्चाने फलटण शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच रविवार पेठेमधील उत्कर्ष लॉज येथे 75 बेड्सचे कोरोना केअर सेंटर सुरू करणार आहेत,’ अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.
सध्या सातारा जिल्ह्यासह माण तालुक्यातही रुग्णांना लागणार्या ऑक्सिजनच्या अपुर्या साठ्यामुळे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले असून, अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत असल्याने स्वत:चा व्यवसाय काही दिवस बंद ठेवावा लागला तरी चालेल; परंतु कोविड रुग्णांचे प्राण वाचले पाहिजेत, या सामाजिक बांधिलकीतून गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील व्यावसायिक आत्माराम कदम यांनी ऑक्सिजन सिलिंडर दान करून रुग्णांना वाचवण्यासाठी खूप मोठं काम केलं आहे.
म्हसवड शहरातील कोरोनाबाधित रस्त्यावर फिरत असल्याने कोरोना वाढत आहे. या लोकांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आरपीआय नेते किशोर सोनवणे यांनी केली आहे. ‘जनता कर्फ्यू’चे तीनतेरा वाजल्यामुळे म्हसवड पालिका व पोलीस यंत्रणेत ताळमेळ जुळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणार्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजारांचा दंड शुक्रवारी वसूल केला. पालिकेच्या मुख्याधिकार्यांच्या या धाडसी कारवाईचे शहरातून चांगलेच कौतुक केले जात आहे.
जावळी तालुक्यातील मेरुलिंग मेढा घाटात रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास इर्टिका कार मेरुलिंग घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून पलटी झाली. या अपघातात तीनजण जागीच ठार तर पाचजण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर माण आणि खटाव तालुक्यांत ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज कोविड सेंटर उभारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते व कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.
कोरोनाच्या पूर्वी लग्न थाटामाटात साजरी केली जात होती. लग्न म्हटले की बँड-बाजा आलाच. नाच गाणे आले. लग्न काय पुन्हा पुन्हा होतंय का? हौसेला मोल नाही त्यामुळे लग्नात भरमसाठ खर्च केला जायचा. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळायचा. त्यावर अनेकांची कुटुंब चालायची. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातल्यामुळे बँड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1933 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 39 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.