क्रीडा

esahas.com
क्रीडा

डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या प्रयत्नातून चैतन्य रुग्णालय कोविडसाठी हस्तांतरित

गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील ब्रह्मचैतन्य देवस्थान ट्रस्टचे चैतन्य रुग्णालय प्रशासनाने कोविड सेंटरसाठी अधिगृहित केले होते. विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या प्रयत्नातून देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या सहकार्याने आज चैतन्य रुग्णालय लोकांच्या सेवेसाठी कोविड सेंटर म्हणून आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली.

esahas.com
क्रीडा

मेढा येथे उभा राहणार ऑक्सिजन निर्मिती प्लांट

कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडाला असून, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या माध्यमातून मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभा राहणार आहे. या प्लांटसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतःच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला असून, लवकरच या प्लांटच्या उभारणीस प्रारंभ होणार आहे. 

esahas.com
क्रीडा

ना. एकनाथ शिंदे धावले जावळीकरांच्या मदतीला

जावळी तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अशातच जावळी तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी लवकरच तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा येथे सर्व सोयींनियुक्त ऑक्सिजनसह 30 बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात यावे तसेच बामणोली येथेही 10 बेडच्या रुग्णालय उभारणी करावी, असा आदेश राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांना दिल

esahas.com
क्रीडा

कोरोनाग्रस्त मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीच्या लाकूड व्यवहारात 30 लाखांचा अपहार 

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारावरील प्रत्यक्ष खर्च आणि सातारा पालिकेने काढलेल्या बिलात तफावत आहे. प्रत्येक मृत व्यक्तीमागे दोन हजार जादा खर्च होत असून आजअखेर दीड हजारांहून जास्त मृतांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. म्हणजेच जवळपास 30 लाखांचा अपहार झाला असल्याचा आरोप अमित शिंदे, बाळासाहेब शिंदे व जितेंद्र वाडकर आदींनी केला आहे.

esahas.com
क्रीडा

‘वाई अर्बन बँक’ परिवाराकडून कोविड केअर सेंटरसाठी 100 बेड

‘सध्या सर्वत्र सुरू असलेल्या कोरोना वैश्‍विक महामारीवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपाययोजनांना मदत करण्यासाठी वाई अर्बन बँक परिवाराच्या वतीने 100 बेड कोरोना केअर सेंटरकरिता वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजितसिंह भोसले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत,’ अशी माहिती दि वाई अर्बन को. आँप. बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी दिली. 

esahas.com
क्रीडा

लोणंद शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; कडक कारवाई करण्याची गरज

लोणंद शहरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली असून, सकाळची 7 ते 11 प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक सेवेत चालू असणार्‍या दुकानांवर गर्दी होत असून येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्याची गरज आहे, मात्र कारवाई होताना दिसत नाही. 

esahas.com
क्रीडा

आ. शशिकांत शिंदे यांच्याकडून पुसेगाव कोरोना सेंटरची पाहणी

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वत्र रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संकटात माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना सेंटरला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला. डीपीसीमधून पुसेगाव कोरोना सेंटर 30 ऑक्सिजन बेड व इतर सुविधांसाठी 10 लाख निधी दिला आहे. ऑक्सिजन बेडच्या लाईनचे काम पूर्ण झाले असून, लवकरच मशीन कार्यान्वित होतील. तसेच अपुर्‍या असणार्‍या सुविधांसाठी आमदार फंड

esahas.com
क्रीडा

‘भक्ती फाउंडेशन’च्या वतीने इंद्रायणी जवळ-मस्के यांचा सन्मान

सातारा येथील ‘भक्ती फाउंडेशन’च्या वतीने डॉ. अशोकराव पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदिका इंद्रायणी जवळ-मस्के यांना प्रमाणपत्र व डॉ. उज्ज्वला सहाने लिखित प्रेरणा पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. 

esahas.com
क्रीडा

आधुनिक युगात भगवान महावीर यांची शिकवण मोलाची

‘भगवान महावीर यांनी आदर्श जीवन पद्धतीची जी तत्त्वे सांगितली आहेत, त्याचा आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वीकार करून समृद्ध आयुष्य जगावे. तसेच आधुनिक युगात भगवान महावीर यांची शिकवण मोलाची आहे,’ असे प्रतिपादन डॉ. प्रमोद गावडे यांनी केले.

esahas.com
क्रीडा

पाचगणी येथील कोविड सेंटरला आ. मकरंद पाटील यांची भेट

पाचगणी डॉन अ‍ॅकॅडमी व बेल एअर हॉस्पिटल येथील कोविड केअर सेंटरला आ. मकरंद पाटील यांनी भेट देऊन कोरोना रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित यंत्रणेला तशा सूचना दिल्या. आमदारांच्या भेटीने रुग्णांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले.