ना. एकनाथ शिंदे धावले जावळीकरांच्या मदतीला
मेढा येथे लवकरच उभारणार 30 बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय; रुग्णांना मिळणार वेळेत उपचार
जावळी तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अशातच जावळी तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी लवकरच तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा येथे सर्व सोयींनियुक्त ऑक्सिजनसह 30 बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात यावे तसेच बामणोली येथेही 10 बेडच्या रुग्णालय उभारणी करावी, असा आदेश राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांना दिल
कुडाळ : जावळी तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अशातच जावळी तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी लवकरच तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा येथे सर्व सोयींनियुक्त ऑक्सिजनसह 30 बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात यावे तसेच बामणोली येथेही 10 बेडच्या रुग्णालय उभारणी करावी, असा आदेश राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांना दिला.
कोविड रुग्णालयासाठी संबंधित अधिकार्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा. तसेच या ठिकाणी सर्व त्या उपाययोजना कराव्यात. कोविड रुग्णालयासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही ना. एकनाथ शिंदे यांनी दिली.
कोरोनामुळे हैराण झालेल्या जावळीकरांची व्यथा शनिवारी शिवसेना संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, समाजसेवक विजय सावले व उद्योजक के. के. शेलार यांनी मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना ऐकवली.
शिवसेना संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे म्हणाले, ‘जावळी तालुक्यात कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत चालली असून, ऑक्सिजन अभावी रुग्णांचे बळी जात आहेत. तसेच रेडमेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने उपचारास अडचणी येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांवर तातडीने उपचार करता यावे म्हणून मेढा येथे सुसज्ज कोविड रुग्णालय होणे गरजेचे आहे. यावर मंत्री ना. शिंदे यांनी तातडीने पावले उचलून वरिष्ठ आधिकर्यांना दूरध्वनीवरून मेढा येथे ऑक्सिजनसह सर्व सोयींनियुक्त 30 बेड व बामणोली येथे 10 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यात यावे, असा आदेश दिला. येत्या काही दिवसांतच ही सेवा सर्वसामान्य जावळीकरांसाठी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध होईल व जावळी तालुक्यातील नागरिकांना वेळेत उपचार मिळणे शक्य होईल,’ असा विश्वास ओंबळे यांनी व्यक्त केला.
जावळी तालुक्यातील या महत्त्वाच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन होत आहे.
स्वखर्चाने केली रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध
जावळी, महाबळेश्वर तालुक्यांतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार्या मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जावळी व महाबळेश्वर तालुक्यांतील मुंबई व ठाणे येथे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन स्वखर्चाने तातडीने उपलब्ध करून दिली. त्यामुळे मंत्री शिंदे यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.