बर्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर देऊर-बिचुकले रस्ता अखेर मार्गी
माजी जि. प. सदस्य राहुल कदम यांच्या पाठपुराव्याला यश : रस्त्यासाठी दोन्ही गावांतील लोकांनी दिल्या विनामोबदला स्वतःच्या जमिनी
देऊर-बिचुकले गावांना जोडणारा पक्का रस्ता व्हावा, ही गेली अनेक वर्षांपासूनची दोन्ही गावांची मागणी अखेर मंजूर झाली असून 2800 मी. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. लवकरच या दोन्ही गावांना जोडणारा मजबूत रस्ता तयार होणार आहे. यामुळे शेती तसेच शालेय मुले, नोकरदार लोकांचा प्रश्न सुटणार आहे.
पिंपोडे बुद्रुक : देऊर-बिचुकले गावांना जोडणारा पक्का रस्ता व्हावा, ही गेली अनेक वर्षांपासूनची दोन्ही गावांची मागणी अखेर मंजूर झाली असून 2800 मी. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. लवकरच या दोन्ही गावांना जोडणारा मजबूत रस्ता तयार होणार आहे. यामुळे शेती तसेच शालेय मुले, नोकरदार लोकांचा प्रश्न सुटणार आहे.
महाराष्ट्र शासन उद्योग व अपारंपरिक ऊर्जा अंतर्गत देऊर-बिचुकले गावच्या 2800 मीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू झाले असून, या कामासाठी अंदाजे 2 कोटी 75 लाख 38 हजार 844 रुपयांची मंजुरी मिळाली आहे. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून, या कामासाठी देऊरचे माजी जि. प. सदस्य राहुल कदम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, कोरेगावचे आ. महेश शिंदे यांच्यामुळे हा रस्ता प्रत्यक्षात साकारला जात आहे.
तसेच या नवीन होणार्या रस्त्यासाठी बिचुकले व देऊर येथील शेतकर्यांनी विनामोबदला स्वतःच्या जमिनी दिल्यामुळेच हा नवीन रस्ता साकारणार आहे. देऊरपासून बिचुकले-नलवडेवाडी गावांना या रस्त्याचा फायदा होणार आहे. तसेच शेतीसाठी ही हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
तसेच यावेळी श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे चेअरमन धनसिंग कदम, सरपंच शामराव कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य अजित कदम, प्रकाश देशमुख, वसंत कदम, ठेकेदार फडतरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
देऊर-बिचुकले हा जुना कच्चा रस्ता होता. मात्र, अनेक ठिकाणी या रस्त्यावर अडचणी असल्याने लोकसहभागातून नव्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी देऊर बिचुकले गावातील शेतकर्यांनी विनामोबदला जमिनी देऊन सहकार्य केल्यामुळेच हा रस्ता मार्गी लागला आहे.
- शामराव कदम, सरपंच, ग्रामपंचायत देऊर.