sports

आरोग्य यंत्रणेकडे मनुष्यबळ कमी असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी

डॉ. अनिरुद्ध आठल्ये : कुडाळ येथे कोरोनाबाबत बैठक संपन्न

‘सातारा जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेमध्ये सध्या मनुष्यबळ खूप कमी आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने आरोग्य विभागास काम करण्यास अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यापेक्षा नागरिकांनीच स्वतःची काळजी घ्यावी, हाच कोरोनावर एकमेव उपचार,’ असा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिला आहे.

कुडाळ : ‘सातारा जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेमध्ये सध्या मनुष्यबळ खूप कमी आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने आरोग्य विभागास काम करण्यास अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यापेक्षा नागरिकांनीच स्वतःची काळजी घ्यावी, हाच कोरोनावर एकमेव उपचार,’ असा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिला आहे.

कुडाळ (ता. जावळी) येथे एका बैठकीच्या दरम्यान ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार, पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे उपस्थित होत.े

जावळी तालुक्यामध्ये सोमर्डी, कुडाळ, मेढा, सायगाव आणि वाडी या विभागांमध्ये कोरोना सेंटर उभा करण्यासाठी आजची आयोजित बैठक घेतली होती. 

गावातील रुग्ण गावातच बरा झाला पाहिजे, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कोरोना केंद्र उपलब्ध करत ऑक्सिजनचे बेड व इतर साहित्य सामुग्री उपलब्ध करत गावातील रुग्ण गावातच बरा करण्याचा उपक्रम सुरू करण्याच्या हेतू आहे.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण आहे आणि आरोग्य विभागाकडे सध्या मनुष्यबळही खूप कमी आहे. मनुष्यबळाअभावी आरोग्य विभाग हतबल आहे.त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा उपचार हा स्वतःची काळजी घेऊन स्वतः करावा, असा सल्ला देखील त्यांनी दिल्याने आरोग्य विभाग मनुष्यबळाच्या अभावी हात वर करत आहे, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.