केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनचा मार्ग बंद करून राज्यातील एसटी बस पुन्हा पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी बहुजन वंचित आघाडीच्यावतीने एसटी आगार आवारात हलगी वादन आंदोलन करून प्रशासनास जाग आणण्याचा प्रयत्न केला.
शहरात आज 32 कोरोना रुग्णांची भर पडली असून, यामध्ये पालिकेतील 7 कर्मचार्यांचा समावेश असल्याने पालिका प्रशासन चांगलेच हादरले आहे. 32 रुग्णांमुळे शहराची कोरोना रुग्णांची शतकाकडे तर तालुक्याची द्विशतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. पालिका कर्मचार्यांच्यामुळे पालिकेचे कामकाज काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आवाहन वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले.
कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला भाग प्रशासनाकडून सील करून तो ‘कंटेन्मेंट झोन’ (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहीर करण्यात येतो. मात्र, या ‘कंटेन्मेंट झोन’चे गांभीर्यच नागरिकांच्या लक्षात येत नसून पुसेगाव (ता. खटाव) येथील कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या भागात लावण्यात आलेले कळक, बॅरिकेटस् बाजूला सारून नागरिकांची ये-जा सर्रास सुरू असल्याचे चित्र गावात बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहे.
भुरकवडी-सिद्धेश्वर कुरोली रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणार्यांवर वडूज पोलिसांनी कारवाई करून 5 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर याप्रकरणी सुशांत हणमंत कदम, विशाल कदम (दोन्ही रा. भुरकवडी), सचिन जाधव उर्फ टमाट्या (रा. वडूज) व वगैरे चार जणांवर वडूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाने अगदी थैमान घातले असताना त्याला रोखण्यासाठी काही नियोजन नसतानासुध्दा सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्या कालावधीत उपाय योजना करण्यात सरकार पूर्णपणे अपशयी ठरले आहेत. त्यामुळे लोकांचे भूकबळी जाण्यापेक्षा सततचा लॉकडाऊनचा पर्याय रद्द करून शासनाने कोरोना नियंत्रणावर लक्ष द्यावे. तसेच एसटी पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी वंचित आघाडीच्या वतीने डफली आंदोलन करण्यात आले.
सातारा व पुणे जिल्हयाच्या सीमेवर असणार्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे वीर धरण भरण्याच्या मार्गावर असून बुधवारी संध्याकाळी चार वाजता वीर धरणाचा पाच नंबरचा दरवाजा एक फुटाने उचलुन एक हजार 200 क्युसेस तर विद्युत गृहातूनही आठशे क्युसेक्स पाणी नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती वीर धरण अभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व्हेजीटेबल अॅन्ड जनरल मार्केट (भाजी मंडई) रा मार्केटमधील 18 गाळेधारकांची उर्वरित डिपॉझीट रक्कम रुपरे 22,01,700/रेणेबाकी होती. राबाबत नगरपरिषदेने वारंवार सूचना देवूनही गाळेधारक शिल्लक डिपॉझीटची रक्कम भरत नव्हते. त्रामुळे त्रांना 22 जून 2020 रोजी नोटीस देवून उर्वरित डिपॉझीट रक्कम भरणेबाबत कळविण्रात आलेले होते. दरम्रान एका गाळाधारकाने रक्कम भरल्राने उर्वरित 17 गाळे सील करण्रात आले आहे. सदर कारवाई पोलिस बंदोबस्तात करण्रात आले आहे.
खंडाळा : शिरवळ येथील जिल्हा चेक नाक्यावरील सारोळा पुलावरुन पडून युवक बेपत्ता झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिरवळ पोलिस व महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्याकडून नदीमध्ये शोधकार्य सुरु आहे. दशरथ सिंग अमरसिंग सिंग (वय 18, राजस्थान) असे पाण्यात पडलेल्या बेपत्ता तरुणाचे नाव आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील भूमिपुत्रांना कोरोना साथीच्या काळात राष्ट्रीय हरित लवाद, सर्वोच्च न्यायालय व जीपीएसने केलेल्या मोजणीचा संदर्भ देत तालुक्यातील भूमिपुत्रांना बांधकामे काढून घेण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कोरोना साथीच्या प्रादुर्भावाने हैराण नागरिकांना वनक्षेत्रपाल, महाबळेश्वर यांनी नोटिसा बजावून नेमकी वेळ साधल्याने भूमिपुत्रांमध्ये अस्वस्थता आहे.