म्हसवड शहरातील कोरोनाची साखळी तुटण्याचे नावच घेत नसून शनिवारी पुन्हा शहरात 13 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले असून यामध्ये 8 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बाधित परिसर सील केला असून, त्या परिसरात म्हसवड पालिकेच्यावतीने निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे.
जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 342 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 10 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. समूह संसर्ग वाढू लागल्याने बाधितांमध्ये दररोज मोठी भर पडत आहे. शनिवारीदेखील 345 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 342 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जावली तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवारी (दि. 22) तब्बल 28 कोरोनाबाधितांची भर पडली असून, शुक्रवारी (दि. 21) 16 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला होता. तर खासगी लॅबमध्ये दोघांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. त्यामुळे दोन दिवसांत तालुक्यात तब्बल 44 कोरोनाबाधित आढळले असून, हे सर्व स्थानिक आहेत. एकूणच तालुक्यात कोरोनाच्या स्थानिक संसर्गाला आता सुरुवात झाली आहे.
देऊर, ता. कोरेगाव येथील एकाच दिवशी 23 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने, गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. एकट्या गावाचा एकूण बाधितांचा आकडा 54 झाला आहे. अर्धशतकाच्या पुढे गेल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने गावासह भागात चिंतेचे वातावरण झाले आहे.
कोळकी, ता. फलटण येथील बसस्थानक परिसरात चोरी केलेला मुद्देमाल विकण्यास आलेल्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दागिने व डीव्हिडी प्लेअरसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
अत्याचार पीडित अल्पवयीन मुली व स्त्रियांना त्वरित न्याय मिळण्यासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र विशेष न्यायालय मिळण्याबाबत व फाशी सारख्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी होण्यासाठी कायद्यात योग्य ते बदल करण्याबाबत मराठा क्रांती मोर्चा, फलटण यांनी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन दिले.
जिल्ह्यात संसर्ग वेगाने पसरू लागला असून एकूण रुग्णसंख्या दहा हजारांच्या जवळ आली आहे. शुक्रवारीही 361 बाधित आढळले तर अकरा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आातापर्यंत 288 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
सातारा जिल्ह्यात संसर्ग वेगाने पसरू लागला असून एकूण रुग्णसंख्या दहा हजारांच्या जवळ आली आहे. शुक्रवारीही 369 बाधित आढळले तर अकरा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आातापर्यंत 288 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.