गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक एकमेकाला धडकून ट्रक रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली. या दुर्घटनेत दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले असले तरी अन्य वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.
खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांना न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
कर्ज असलेल्या जमिनीचा व्यवहार करुन त्याबाबत खोटी कागदपत्रे तयार करुन लिलावात घेतलेले प्लॉटींग घोळाचे असल्याचे समोर आल्याप्रकरणी सातार्यातील साहेबराव को. ऑपरेटीव्ह बँकेच्या पदाधिकार्यांविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल झाली. 8 कोटी 3 लाख रुपयांची फसवणूक झाली असून एकूण 19 जणांवर गुन्हा दाखल झाला अहे.
तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सातारा जिल्ह्यात आढळल्याची नोंद आहे. उंबऱ्यापर्यंत आलेल्या मृत्यूपासून नागरिकांना वाचवण्याचे फार मोठे काम कोरोना योद्धांनी केले आहे. स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता आपल्या आधी दुसरा जगला पाहिजे ही भावनाच फार मोठी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवनात सोमवारी आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांनी 42 हून अधिक तक्रारी मांडल्या. त्यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी या तक्रारींचा निपटारा संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून केला.
केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून फलटण शहर, तालुका व माढा लोकसभा मतदार संघातील विकास कामे व रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्याबद्दल फलटण येथे शुक्रवार दि. २७ जानेवारी रोजी त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी दिली.
महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी एकावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवनचक्की मधील तांब्याची तार आणि दोन मोटरची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.