maharashtra

पवनचक्की मधील तांब्याची तार आणि दोन मोटरची चोरी


पवनचक्की मधील तांब्याची तार आणि दोन मोटरची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : पवनचक्की मधील तांब्याची तार आणि दोन मोटरची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान जायगाव, ता. खटाव गावच्या हद्दीतील गट नंबर 862/1 मध्ये असणाऱ्या पवनचक्की मधील 250 किलो वजनाची तांब्याची तार असलेली केबल व दोन मोटर असा 1 लाख 92 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद नवनाथ विश्वनाथ देशमुख यांनी औंध पोलीस ठाण्यात नोंदवली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार जाधव करीत आहेत.