राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवनात सोमवारी आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांनी 42 हून अधिक तक्रारी मांडल्या. त्यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी या तक्रारींचा निपटारा संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून केला.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवनात सोमवारी आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांनी 42 हून अधिक तक्रारी मांडल्या. त्यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी या तक्रारींचा निपटारा संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून केला.
यावेळी नागरिकांच्या समस्या महसूल विभाग, महावितरण विभाग, जिल्हा परिषदेचे विविध विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, धरणग्रस्त, कृषी विभाग, अशा अनेक खात्यातील समस्या माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सोडविण्यात आलेल्या आहेत.
यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, अतुल शिंदे, रमेश उबाळे, युवराज पवार, संतोष पवार, विजय कुंभार, कामेश कांबळे, प्रथमेश पवार, महेश जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


