गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक एकमेकाला धडकून ट्रक रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली. या दुर्घटनेत दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले असले तरी अन्य वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.
सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक एकमेकाला धडकून ट्रक रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली. या दुर्घटनेत दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले असले तरी अन्य वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, खंडाळा येथून सातारकडे मालट्रक क्रमांक टी.एन. ५२ एबी ४१२७ ला पाठीमागून येणाऱ्या रेडिमिक्स मिक्सर ट्रक क्रमांक एम.एच.११ सीएच ८७२६ ने जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही वाहने महामार्गावरच पलटी झाली. ट्रकमधील साहित्य रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झाला. परिणामी घाटात वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले.


