Country Which Refund Full Toll Amount To Drivers: राज ठाकरेंनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतुककोंडीनंतर टोलचे पैसे परत करावेत अशी मागणी केली आहे. मात्र असं काही होण्याची शक्यता कमी असली तरी एका देशात अशापद्धतीने पैसे परत केले जातात.
गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक एकमेकाला धडकून ट्रक रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली. या दुर्घटनेत दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले असले तरी अन्य वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.
सध्या सातारा-टेभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम पुसेगांव गावठाणातून चालू आहे. त्यामुळे रस्ता खोदलेला असल्याने, वाहतुकीस रस्ता उपलब्ध होत नसल्याने 10ते 12 दिवस पुसेगाव हद्दीतील वाहतुक वळवण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहर प्रमुख राम जाधव यांनी केली आहे.
येथील कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन कृष्णा पुलावर आज बुधवारी १ रोजी सुमारे दोन तासांपेक्षा जास्त काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीमुळे कृष्णा नाका येथील सिग्नलपासून गजानन हौसिंग सोसायटी आणि कृष्णा कॅनॉलपासून वेणूताई चव्हाण महाविद्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पुसेसावळी ता खटाव येथे होत असलेल्या वाहतूक कोंडी मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी वडूज कराडरस्त्यावर नेहमीच वर्दळ असते त्यामुळे रस्त्यावर अस्तव्यस्त पणे वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी निर्माणहोत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने वाहतूक कर्मचारी नेमून ही वाहतूक कोंडी सुरळीत करावी अशी मागणी होताना दिसत आहे. पुसेसावळीतुन बाहेर पडण्यासाठी बाह्य रस्ता असतानाही ...
ठोसेघरकडे जाणार्या मार्गावरील बोरणे घाटात पावसामुळे गुरुवारी मध्यरात्री दरड कोसळली असल्याने शुक्रवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, वाहनचालकांसह प्रवाशांनी छोठे-छोठे दगड हटविल्याने एकेरी वाहतूक सुरू झाली असून, मोठमोठे दगड अद्याप रस्त्याच्या मधोमधच असल्याने ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.
खंडाळा : शिरवळ येथील जिल्हा चेक नाक्यावरील सारोळा पुलावरुन पडून युवक बेपत्ता झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिरवळ पोलिस व महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्याकडून नदीमध्ये शोधकार्य सुरु आहे. दशरथ सिंग अमरसिंग सिंग (वय 18, राजस्थान) असे पाण्यात पडलेल्या बेपत्ता तरुणाचे नाव आहे.