maharashtra

महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा


महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल घ्या समोर निसर्गा नावाच्या नाष्टा सेंटरच्या बाजूस एका विवाहितेचा विनयभंग करून तिला, तिच्या पतीला आणि नणंदेला मारहाण केल्याप्रकरणी आबा डागा, लक्ष्मी डागा, दिशा डागा, तिघेही राहणार सदर बाजार, सातारा यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.