येथील पुण्यशील राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले ग्रंथालयाच्या वतीने रविवार दिनांक 15 पासून राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले व्याख्यानमाला आयोजित केली आहे. सदर बाजार मधील ग्रंथालयात दररोज सायंकाळी सव्वा पाच वाजता ही व्याख्यानमाला होईल.
आज (8 सप्टेंबर) आणि उद्या (9 सप्टेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी शांततेत धरणे धरणाऱ्या मराठा आदोलकांवर पोलिसांनी जालना जिल्ह्यात लाठी हल्ला केला. त्याप्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. त्याविरोधात आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला कराडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्पर्तीने दुकाने व्यव...
बुधवारी (30 ऑगस्ट) दिवसभरात कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा असे पंचागकर्ते मोहन दाते म्हणाले.
पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैशाची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे. या सगळ्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी हिंगोलीतील औंढा नागनाथ, बीडमधील वैद्यनाथ, छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे.
पोलीस प्रशासनाने तक्रार दाखल झाल्यानंतर किंवा अटकपूर्व जमीन फेटाळल्यानंतर लगेच संबंधिताला अटक करणे क्रम प्राप्त असताना कोणत्या राजकीय दबावाला बळी पडून आरोपीला अभय देण्याचा प्रयत्न चालू आहे की काय ? अशी तक्रारदारांमध्ये शंका निर्माण होत आहे.तसेच संबंधित आरोपी हा बरेच वर्षापासून अशा पद्धतीची फसवेगिरी करत असल्याचे समोर आले आहे.आरोपी आपल्या असणाऱ्या प्रॉपर्टी विकून पसार होण्याची पोलीस प्रशासन वाट पाहत आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे.
Adhik Maas 2023 : यंदा अधिक महिना असल्याने उद्यापासून अधिक श्रावण महिन्यास सुरुवात होणार आहे. श्रावणातील सगळे व्रत, उपवास 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत करावे, अधिक मासात करु नयेत. असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी स्पष्ट केले.
सवड येथील शिंपी समाजाचे वतीने सातारा नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांचे मार्गदर्शनाखाली संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ६७३ वी संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडली या वेळी पहाटे काकड आरती अभिषेक आदी झाले वर झांज पथक ढोल ताशा यांचे गजरात विठ्ठल रखुमाई निवॄती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई नामदेव महाराज यांचें जिवंत व्यक्ती रेखा यांचें उपस्थि...
Maharashtra Cabinet: मंत्र्यांसाठी देण्यात आलेल्या बंगल्यांवरून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस गटातील मंत्र्यांंमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.