साताऱ्यात कोट्यवधी रुपयाचा गंडा घालून आरोपी फरार
मल्ल्या सारखा साताऱ्यातील यादव सुद्धा परदेशात फरार होण्याच्या तयारीत
पोलीस प्रशासनाने तक्रार दाखल झाल्यानंतर किंवा अटकपूर्व जमीन फेटाळल्यानंतर लगेच संबंधिताला अटक करणे क्रम प्राप्त असताना कोणत्या राजकीय दबावाला बळी पडून आरोपीला अभय देण्याचा प्रयत्न चालू आहे की काय ? अशी तक्रारदारांमध्ये शंका निर्माण होत आहे.तसेच संबंधित आरोपी हा बरेच वर्षापासून अशा पद्धतीची फसवेगिरी करत असल्याचे समोर आले आहे.आरोपी आपल्या असणाऱ्या प्रॉपर्टी विकून पसार होण्याची पोलीस प्रशासन वाट पाहत आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे.
मुख्य सूत्रधारांपैकी एकजण अमेरिकेत एकजण चेन्नईत तर एकजण करहर गावची सरपंच असून शाहूपुरी पोलीस स्टेशन सातारा येथे सात जणांवर गुन्हा दाखल असून संशयित महाड, छत्रपती संभाजीनगर, वाशी येथील असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. एक कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून सात जणांची ६७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सात जगांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नरेंद्र चंद्रकांत यादव, सोनाली नरेंद्र यादव, अमोल मोरेश्वर कोशे रमेश विष्णु कोशे (सर्व रा. महाड, जि. रायगड), श्रीकांत दीक्षित (रा. छत्रपती संभाजीनगर) व मधुसूदन बाळकृष्ण कृष्णांन (रा. वाशी, नवी मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत चंद्रकांत गुलाबराव पवार (रा. पिरवाड़ी, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. आठ जुलै २०१६ से सात जून २०२२ या कालवधीत माजी राज्यपाल गणपतराव तपासे रस्त्यावरील गोदावरी कॉम्प्लेक्समधील कार्यालयात हा प्रकार घडला आहे.
पवार यांचा पुठ्ठ्याचे बॉक्स बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यातून त्यांची संशयितांशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांना एक कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी तीन लाख रुपये प्रोसेसिंग फी घेतली. त्यानंतर कंपनीकडे १२० कोटी रुपयांचा चेक आला आहे, तो मिळण्यासाठी आमच्याकडे ६० लाख रुपये नाहीत असे संशयिताना त्यांना सांगितले. त्या रकमेची तजवीज करा, असे संशयितांनी त्यांना सांगितले. त्यानुसार पवार यांनी व धनाजी अडसूळ व हरिहर कोडलकर (रा. कोडोली), श्रीकांत भोसले व राहुल मोरे (दोघे रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), किसन भोसले (रा. पिंपळवाडी, ता. फलटण), गोरख चौधरी (रा. बारामती) या सर्वांनी एकत्रितपणे ६० लाख रुपये रोख रक्कम एम. के. अलायन्स लि. कंपनीच्या कार्यालयात भरले. त्यानंतर संबंधित कंपनी व पवार यांच्या श्रवणी पॅकेजिंग यांच्यात ७५ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्याच्या समजुतीचा करारनामा झाला परंतु त्यानुसार त्यांना कर्जाचे वितरण झाले नाही, तसेच वाढीव कर्ज मंजूर होणार नसतानाही त्यापोटी चार लाख ५० हजार रुपये परत करतो, असे सांगूनही न देता संशयितांनी एकूण ६७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
शाहूपुरी पोलीस स्टेशनला तक्रारदारांची रीघ
या तक्रारीनंतर कराड मधील एका बांधकाम व्यवसायिकाचे 30 कोटी कर्ज देतो म्हणून 80 लाख रक्कम घेतल्याच्या समोर आले आहे.असेच अनेक तक्रारदार समोर येत असून या प्रकरणाची व्याप्ती फार मोठे असल्याची शक्यता आहे, एवढं सगळं असून सुद्धा संबंधित आरोपीला पोलीस प्रशासन मदत करते की काय अशी शंका निर्माण झाली आहे.यामध्ये राजकीय दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण करहर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ही या फायनान्स कंपनीमध्ये भागीदार आहेत तक्रारदार हे आपल्या गेलेल्या पैशाची लवकर परत मिळावेत या उद्देशाने पोलीस प्रशासनाने आरोपींना लवकर अटक करा असा आग्रह धरताना दिसत आहेत .