येथील पुण्यशील राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले ग्रंथालयाच्या वतीने रविवार दिनांक 15 पासून राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले व्याख्यानमाला आयोजित केली आहे. सदर बाजार मधील ग्रंथालयात दररोज सायंकाळी सव्वा पाच वाजता ही व्याख्यानमाला होईल.
सातारा : येथील पुण्यशील राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले ग्रंथालयाच्या वतीने रविवार दिनांक 15 पासून राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले व्याख्यानमाला आयोजित केली आहे. सदर बाजार मधील ग्रंथालयात दररोज सायंकाळी सव्वा पाच वाजता ही व्याख्यानमाला होईल.
रविवार दिनांक 15 रोजी इतिहास संशोधक प्राध्यापक अरुण घोडके यांचे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व या विषयावर, सोमवार दिनांक 16 रोजी प्राध्यापक डॉक्टर मंजुश्री पवार कोल्हापूर यांचे स्वराज्य संकल्पक जिजाबाईं ते स्वराज्य रक्षक ताराबाई या विषयावर, मंगळवार दिनांक 17 रोजी प्राध्यापक डॉक्टर विनायक जाधव यांचे स्वराज्य विस्तारक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज पहिले, बुधवार दिनांक 18 रोजी प्राध्यापक निरंजन फरांदे यांचे सुधारकी-बाण्याचे प्रजाहितदक्ष राजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले, गुरुवार दिनांक 19 रोजी डॉक्टर अच्युत गोडबोले, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, दादासाहेब आहेरराव, अशोक वाळिंबे हे आठवणीतील परमपूज्य आईसाहेब महाराज या विषयावर आणि शुक्रवारी तारीख 20 रोजी प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांचे राजमाता ते लोकमाता या विषयावर व्याख्यान होणार आहे.
राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त 20 ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळा होणार आहे. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विक्रमसिंहराजे भोसले, सत्वशीलाराजे, वृषालीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथालय समितीचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


