जिजामातानगर, ता. कराड येथील प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याची ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. टाकाऊ पासून टिकाऊ या पद्धतीचे हे आकाशकंदील विद्यार्थ्यांनी स्वतः घरी तयार केले. यामध्ये सर्व इयत्तांचे सर्व विद्यार्थी ऑनलाईन स्वरूपात सहभागी झाले होते. सदर, कार्यशाळेत बनवलेले आकाशकंदील शाळेत जमा करण्यात आले.
सातारा शहरानजीक ट्रक व कारचा अपघात झाला. ही घटना दि. 1 रोजी दुपारी घडली असून याप्रकरणी नितीन दिलीप कुलकर्णी (ठाणे) यांनी ट्रक चालक अर्जुन रावसाहेब गायकवाड (वय 33, रा.गंगापूर, औरंगाबाद) याच्याविरुध्द तक्रार दिली आहे.
सातारा येथील धनगरवाडी परिसरात असणाऱ्या श्रीकृष्ण कॉलनी येथून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार एका महिलेने दिली आहे.
सातारा येथील व्यंकटपूरा पेठेतील चैतन्य वास्तू अपार्टमेंटमध्ये चालू असलेल्या कामाच्या ठिकाणाहून सोळा हजार रुपये किंमतीच्या सेंट्रिंग प्लेटा चोरी कणराऱ्या दोन महिलांना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले आहे. सोमवती विजय घाडगे आणि सुरेखा शिवाजी जाधव अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
सातारा शहर परिसरातील अट्टल दुचाकी चोरटा आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विकी ऊर्फ विकास मुरलीधर मुळे यास तडीपार करण्यात आले होते. मात्र, सातारा शहरातून तडीपारीची कारवाई झालेली असतानाही तो ऐन दिवाळीत सातारा शहरातील बाजारपेठेत फिरताना आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सातार्यातील करंजे येथे दुकान फोडून त्यातून 50 हजार रुपयांचे साहित्य चोरणार्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) ताब्यात घेतले. त्यातील एकजण अल्पवयीन असून संशयितांकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, एका दिवसात पोलिसांनी हा गुन्हा ओपन केला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मलकापूर नगरपालिकेने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना वैयक्तिक घरकुलांसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार मंजूर 203 पैकी 112 घरकुलांसाठी केंद्र शासनाकडून 55.20 लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला. मात्र, उर्वरित 249.30 लाख रुपयांचा निधी मिळाला नसल्याने लाभार्थींच्या घरकुलांची कामे अपुर्ण राहिली आहे.
सध्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे यामध्ये दुकानदार, व्यापाऱ्यांनी ५० मायक्रोन पेक्षा कमी प्रतीच्या प्लास्टिकचा वापर करू नये, अशा सूचना नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच अशा प्लास्टिकची विक्रीही करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध शाळांमधील 773 विद्यार्थींनीना या प्रकल्पांतर्गत स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. ज्या मुलींनी प्रशिक्षण घेतले आहे त्यांनी इतर मुलींनाही प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. दिवाळीनंतर प्रत्येक शाळेमध्ये जावून मुलींना स्वसरंक्षणाचे धडे देण्यात येणार असून त्याचे नियोजनही झाले असल्याचे बोऱ्हाडे यांनी समारोपाप्रसंगी सांगितले.
सातारा येथील समाजकल्याण कार्यालयाजवळ चाकूचा धाक एकाला दाखवून लुटणाऱ्या दोघांना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.